आपण जगताना आनंदी राहिले पाहिजे आणि इतरांना आनंदी ठेवले पाहिजे.

बेंगलोर, मे ८, २०११

श्री श्री रवी शंकर: स्वतः ला शांत ठेवण्यासाठी दिवसातला काही वेळ आपण मोकळा ठेवला पाहिजे. यासाठी, आपण सजग राहिले पाहिजे की जे आज आहे ते काही काळाने नसणार आहे, पाण्याच्या बुडबुड्यासारखे.  अस्थिरतेबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. आपण जगतो तर आनंदात जगावे आणि इतरांना आनंदात ठेवावे. आपण जेंव्हा मृत्यूला आठवतो तेंव्हा आयुष्याचे प्रश्न कमी वाटतात.
आपण जगताना आपल्याला दोन गोष्टी मिळवायच्या असतात - आपण किती प्रेम वाटले आणि किती ज्ञान मिळवले. याच दोन गोष्टी अशा आहेत की ज्या मेल्यावर सुद्धा आपल्याबरोबर राहतात.

दररोज थोडावेळ बसून ध्यान केले पाहिजे - दुसरे की विचार करतात अशा अनावश्यक गोष्टींपासून मोकळे व्हा. आपल्याला हे जाणून घेतले पाहिजे की देव(परमात्मा) सगळ्यांमध्ये आहे. जर तो सगळ्यांमध्ये नसेल, तर आपण त्याला देव म्हणू शकत नाही. तो नेहमी इथे आहे, सगळीकडे आणि आपल्या सगळ्यांमध्ये. आपण डोळे बंद करून त्याला पाहतो आणि यालाच ध्यान म्हणतात. गुरु, देव आणि आत्मा हे सारखेच आहेत.

जेंव्हा तुम्ही आश्रमात येत, तुमचा सगळ्या चिंता इथेच सोडून द्या - त्यांना तुमाचाबारोब्र परत घेऊन जाऊ नका.
तुम्ही जेंव्हा सेवा करता, तुमचा गरजांची काळजी घेतली जाते. आपले काम ज्ञान पसरवणे हे आहे. तुम्ही ज्ञान पसरवा, आणि तुम्हाला जे गरजेचे आहे ते आपोआप होईलच.

आपली स्वतःची कमाई स्वतःवरच खरच करण्यात काही अर्थ नाही. त्यातले २-३ टक्के सामाजिक कार्य, धर्म जागृती (सत्य पसरवणे) यासाठी दिले पाहिजेत – त्याने भ्रष्टाचार कमी होईल. आपण सगळे एकत्र आले पाहिजे आणि देशवासियांना त्यासाठी उत्तेजन दिले पाहिजे.

जेंव्हा तुम्हाला प्रश्न पडेल स्वतःला विचारा, आणि जर उत्तर नाही मिळाले, तरच तुमच्या गुरूला विचारा. तुमच्या प्रारब्धानुसार(मागचे कर्म) तुम्हाला बाकीचा गोष्टी मिळतील आणि सगळ्या चांगल्याच गोष्टी होतील.

संगीत, ध्यान आणि ज्ञान - या तीनही गोष्टी आयुष्यात असल्या पाहिजेत

सेवेमधून कार्य शुद्ध होते!

मंगळवार, २६ एप्रिल २०११

आर्ट ऑफ लिविंग केंद्र ,टेक्सास,अमेरिका
१२, एप्रिल,२०११


प्रश्न: न्यायासाठी लढताना शांती कशी ठेवू शकतो?
श्री श्री रवि शंकर:
हेच संपूर्ण भगवत गीतेचे सर आहे. आतून शांत राहून जेंव्हा आवश्यक असेल तेंव्हा कृत्य करावे. जेंव्हा आवश्यक असेल तेंव्हा लढावे, परंतु त्या लढाईला आपल्या मनात ठेवू नये. बऱ्याच वेळा आपण आत लढत राहतो आणि बाहेर शांत राहतो. आपल्याला त्याच्या विरुद्ध केले पाहिजे. ध्यानाद्वारे हे परिवर्तन आणणे सहज शक्य आहे. सत्व आणि ध्यान याची शक्ति हे सगळे सोप्पे बनवते.

आज रामनवमी आहे. रा चा अर्थ आहे प्रकाश, आणि म चा अर्थ आहे मी. राम चा अर्थ आहे “ माझ्या आतला प्रकाश” रामाचा जन्म दशरथ आणि कौशल्या यांचा इथे झाला. दशरथ चा अर्थ आहे “दश रथ”. दश रथ पांच इन्द्रिय आणि पांच ज्ञान आणि कृत्य यांना दाखवतो. (उदाहरणार्थ ; प्रजनन,पाय,हात, इत्यादि) कौशल्या चा अर्थ आहे ‘कौशल’. अयोध्या चा अर्थ आहे, “असा समाज जिथे अजिबात हिंसा नाही” जेंव्हा तुम्ही अतिशय बारकाईने याचाकडे बघाल, की आपल्या शरीरात काय प्रेवेश करत आहे, आपल्या आत प्रकाश वाढत आहे. तेच ध्यान आहे. आपल्याला तणावातून मुक्त होण्यासाठी काही कौशल्याची आवश्यता आहे. मग तुम्ही पसरायला सुरुवात होते.
तुम्हाला माहिती आहे की आत्ता तुम्ही इथे आहात तरी तुम्ही इथे नाही. या अनुभवाने की काही प्रकाश लगेच येतो. जेंव्हा आतल्या प्रकाशात चमक येते तेंव्हा तो राम आहे. सीता जे मन/बुद्धि आहे, त्याला अहंकार(रावण) पळवून घेऊन जातो. रावणाला दहा तोंडे होती. रावण (अहंकार) असा होता, जो कुणाचेही ऐकत नसे. तो स्वतःच्या डोक्यात (अहंकार) अडकलेला असे. हनुमान चा अर्थ श्वास आहे. हनुमान (श्वास) चा सहाय्याने सीता(मन) आपल्या रामाजवळ (स्त्रोत्र) जाऊ शकली.
रामायण ७,५०० वर्ष पूर्वी घडले. त्याचा जर्मनी आणि यूरोप आणि पूर्वेचा खूप देशांवर प्रभाव पड़ला. हजारों पेक्षा अधिक नगरांचे नाव रामावरून पडले. जर्मनी मध्ये रामबौघ,इटली मध्ये रोमचे मूळ राम या शब्दामाधेच आहे. इंडोनेशिया, बाली आणि जापान सगळे देश रामायणाने प्रभावित झाले आहेत. तसे तर रामायण एक इतिहास आहे परन्तु ही अशी अनंत घटना आहे,जी नेहमी घडत असते.

प्रश्न: गुरु आदर्श भक्तामध्ये कुठले गुण बघू इच्छितो?
श्री श्री रवि शंकर:
कुठलेच नाही. जर मी कुठला एक गुण सांगितला, तर तुम्ही तोच पाळायला लागाल. यासाठी स्वतःबरोबर स्वाभाविक आणि ईमानदार राहा. जर एक दिवस सुद्धा तुमचे ध्यान करायचे राहिले तर त्यासाठी काळजी करत बसू नका. समय तुम्हाला घेऊन चालला आहे. ज्या काही चांगल्या गुणांचा शोध तुम्ही घेत आहात, ते तसेही तुमाचामध्ये आहेत. तुम्ही इथे आहात आणि सगळे चांगले करत आहात.

उचित आहार घेऊन आपण आपले शरीर शुद्ध ठेवू शकता. वर्षातले २-३ दिवस व्रत ठेवणे चांगले असते. रस घेऊन व्रत करा. परंतु जर तुमचे शरीर याला अनुमति देत नसेल तर करू नका. तुम्हाला तुमच्या शरीराकडे पण लक्ष दिले पाहिजे.
मन प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया यांच्या द्वारे शुद्ध होते.
बुद्धि ज्ञानाद्वारा शुद्ध होते.
भावना भजन केल्याने शुद्ध होतात.
सेवा केल्याने कृत्य शुद्ध होतात.
दान केल्याने धन शुद्ध होते.
तुम्ही तुमच्या उत्पन्नातले २ ते ३ % दान केले पाहिजे.

प्रश्न: येणाऱ्या वर्षांमध्ये तुमचा आर्ट ऑफ लिविंग साथी काय दृष्टिकोण आहे?
श्री श्री रवि शंकर
:मी त्याची सुरुवात केली आहे. मी माझे काम केले आहे. आता हे तुमच्यावर आहे. तुमच्याकडे दृष्टिकोण आहे, यासाठी तुम्ही त्याला जिथे हवे तिथे घेऊन जा. आम्ही जर्मनीमध्ये आर्ट ऑफ लिविंग च्या ३० वर्ष पूर्ण होण्याचा उत्सव साजरा करणार आहोत.  हिटलर नी ७५ वर्षांपुर्वी जसे ओलंपिक स्टेडियम बनवले होते. आपण तिथेच असू. त्यांनी युद्धाची सुरुवात तिथूनच केली. ज्या जागेतून युद्धाची सुरुवात झाली, आपण तेथूनच शांतीचा प्रचार करूयात.



प्रश्न: खूपशा युद्धाचे कारण धर्म का असतो?
श्री श्री रवि शंकर:
मला पण आश्चर्य वाटते. जगामध्ये १० मुख्य धर्म आहेत. ४ मध्य पूर्व आणि ६ पूर्व देशांमधले आहेत. पूर्वेकडील ६ धर्मांमध्ये अजिबात द्वंद्व नाही. हिंदू,बुद्ध,सिख, जैन,शिंटो आणि ताओ धर्म एकच वेळी अस्तित्वात होते. जेंव्हा राष्ट्रपति निक्सन जापानला गेले , तेंव्हा त्यांच्या एका बाजूला शिंटो संत होते आणि दुसर्या बाजूला बौद्ध संत होते. त्यांनी शिंटो संताना विचारले की जपानमध्ये शिंटो किती टक्के आहेत? संताने सांगितले ८०% त्यांनी परत बौद्ध संताला विचारले की जपान मध्ये बुद्ध कितने प्रतिशत है?  संताने सांगितले ८०%.  निक्सन ना आश्चर्य वाटले की हे कसे शक्य आहे.  शिंटो बुद्ध मंदिरामध्ये जातात आणि बुद्ध शिंटो मंदिरामध्ये जातात. त्याच प्रकारे हिंदू सिख गुरूद्वारमध्ये जातात, आणि सिख हिंदू मंदिरामध्ये जातात. भारमध्ये हीच गोष्ट हिंदू आणि बुद्ध लोकांसाठी सांगितले जाऊ शकते. त्याच प्रकारे चीनमध्ये बुद्ध आणि ताओ धर्मामध्ये कोणतेही द्वंद नाही.

मध्य पूर्वेच्या चार धर्मांमध्ये नेहमी युद्ध झाले. यांनी इतर ६ धर्मांकडून शिकले पाहिजे की एकत्र कसे टिकून राहिले पाहिजे. ईसाई आणि यहूदी धर्म यांचाशी मित्रता आहे. यहूदी आणि इस्लाम धर्मामध्ये काही त्यांचातला मुद्दा आहे.

प्रश्न: कर्म आणि भाग्य यात काय अंतर आहे ?
श्री श्री रवि शंकर:
भाग्य याचा अर्थ आहे विधि म्हणजे हे आहे हे असेच आहे. कर्म याचे अनेक अर्थ आहेत. याचा अर्थ कृत्य किंवा अप्रत्यक्ष कृत्य सुद्गा होऊ शकतो. काही कृत्यांचा संस्कारामुळे कुठले दुसरे कृत्य उत्पन्न होऊ शकते आणि त्यालाही कर्म म्हणू शकतो. 

तुम्ही जगाला दिलेली भेट आहात!!!

 
१३ मे २०११  

बेंगलोर आश्रम 

प्रश्न :प्रिय गुरुजी , तुम्ही म्हणालात की आपले नाते ह्या पृथ्वी इतके  जुने आहे. आपण कधी कुठल्या मागच्या जन्मात तुमचा वाढदिवस साजरा केला आहे का? मला आठवत नाही , पण तुमच्या नक्कीच लक्षात असेल. कृपया सांगा ना.
श्री श्री रविशंकर : हो , नक्कीच आपण साजरा केला आहे. आता मला सांग जेंव्हा मला तुम्ही पहिल्यांदा भेटलात तेंव्हा आपण अगदी पहिल्यांदा भेटतोय असे वाटले तुम्हला ? नाही ना , मला सुद्धा मी कोणा अनोळखी माणसाला भेटत आहे असे वाटले नाही . आत्तापर्यंत जेवढ्या लोकांना मी भेटलो आहे , मला नेहमीच असे वाटत आले आहे की मी ह्यांना आधी भेटलो आहे आणि मी ह्यांना आधीपासूनच ओळखतो आहे. आत्तापर्यंत मी कधीच कुठल्या अनोळखी माणसाला भेटलो नाहीये. 
प्रश्न  :गुरुजी मला तुमच्याविषयी उत्कट अभिलाषा हवी आहे , पण ती येते आणि जाते, आणि मन दुसऱ्या गोष्टींच्या मागे धावते . मला हि उत्कट अभिलाषा तुमच्याविषयी सुसंगत कशी राहील?
श्री श्री रविशंकर :  काहीच हरकत नाही. आयुष्यात जरा मजा करा. जेंव्हा तुम्ही म्हणता की मला अभिलाषा नाही , पण तीसुद्धा एक अभिलाषाच आहे. तुमची अभिलाषा हि अभिलाषेसाठीच आहे. तुम्हाला राग येतो कारण तुम्ही रागात असता . तसेच  तुमची अभिलाषा हि अभिलाषेसाठीच आहे हे माहिती असणे पण अभिलाषाच आहे. 
प्रश्न :गुरुजी संकल्प आणि इच्छा ह्यात काय फरक आहे? आणि त्यात जर फरक असेल तर सगळ्या इच्छा ह्या संकल्प स्वरुपात बदलण्यासाठी काय करावे?
श्री श्री रविशंकर :: तुम्हाला माहित असेल मी ह्याविषयी खूप बोललो आहे, संकल्प आणि इच्छा , आणि त्या बदलणे . हे सगळे वैराग्य आहे. खरे तर वैराग्य सगळीकडे कमी येते. 
प्रश्न :गुरुजी मी आज विचार करतो आहे की सगळीकडे प्रकाशाचा समावेश आहे आणि जेंव्हा मी स्वतःमध्ये पाहतो आहे , तिथे तुमचाच प्रकाश माझ्यात आहे . माझ्यात , त्याच्यात आणि सगळीकडेच तुम्ही आणि फक्त तुम्हीच आहात. मी जिकडे पाहतो तिकडे फक्त तुमचाच प्रकाश आहे. तुम्ही कोठून आला आहात आणि तुम्ही कोण आहात? कृपया मला आज तरी सांगा. 
श्री श्री रविशंकर :: मी कोण आहे ह्याचे उत्तर जर पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्याशी एक व्यवहार करावा लागेल . तो व्यवहार म्हणजे, पहिले  तुम्ही हे जाणून घ्या की तुम्ही कोण आहात? आणि जेंव्हा तुम्हाला हे समजेल की तुम्ही कोण आहात तेंव्हा मी कोण आहे हेही तुम्हाला समजेल. आणि हेच मला पाहिजे आहे की तुम्ही जाणून घ्या की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कळेल की मी कोण आहे. 
प्रश्न :हे जग इतक्या जलदगतीने बदलत आहे पण तरीही तुम्ही तेच आहात. न बदललेले इतके सुंदर आणि पूजनीय. हे कसे काय गुरुजी? 
श्री श्री रविशंकर : काही प्रश्न हे आश्चर्यकारक असतात, तसाच हासुद्धा प्रश्न नाहीये पण तुम्ही आश्चर्य करावे असे आहे . प्रश्न हे नेहमीच वेडेवाकडे आणि कुटील असतात पण आश्चर्य हे नेहमी सरळ म्हणूनच आयुष्याचे प्रश्नांकडून आश्चर्यात परिवर्तन करणे हेच ज्ञान आहे .ज्ञान हे प्रश्नांची उत्तरे देत नाही तर प्रश्नांचे आश्चर्यात रुपांतर करते. म्हणूनच ह्याविषयी तुम्ही आश्चर्य बाळगावे असे आहे. 
        आश्रमवासियांनी दररोज भगवदगीतेमधील  श्लोक म्हणणे सुरु केले आहे. मला हे सगळ्यांना सांगायला आवडेल की तुम्ही जिथे कुठे असाल तिथे दररोज भगवदगीतेमधील श्लोक म्हणणे सुरु करा. रोज तीन ते चार श्लोक म्हणा . जरी तुम्हाला संस्कृत कळत नसेल तरी ठीक आहे. नुसता अनुवाद देखील पुष्कळ आहे. 

दुसर्यांच्या मधले चांगले गुण बाहेर आणणे हे आपले काम आहे!!!

सोमवार, मे ९,२०११

बेंगलोर, मे ७:

प्रश्न : गुरुजी , आपण जेंव्हा म्हणतो की अमुक तमुक व्यक्तीला आत्मदर्शन झाले आहे, कृपया मला सांगा की त्यांना काय साक्षात्कार होतो?
श्री श्री रवी शंकर:
साक्षात्कार म्हणजे मी शरीर नाही आणि त्यापेक्षा जास्त आहे हे कळणे. मी इथे माझा या जन्माआधी होतो आणि मी माझ्या मृत्युनंतरही इथे असेन. जर कुणाला हे कळले तर तेव्हडे पुरे आहे. पण ते फक्त तेच सांगू शकतात, इतक लोक नाही सांगू शकत.

प्रश्न : प्रिय गुरुजी, कृपया मला सांगा की आपण अध्यात्म शोधणारे माणसे आहोत की अध्यात्मिक व्यक्ती पण मनुष्याच्या रुपात?
श्री श्री रवी शंकर: दोन्ही. अध्यात्मिक व्यक्ती मनुष्याचा रुपात आणि ज्यांना आपल्या मूळ स्वरूपाकडे परत यायचे आहे.
राधा या शब्दाचा अर्थ महिती आहे का? राधा म्हणजे मूळ स्वरूपाकडे परत येणे. धारा म्हणजे प्रवाह; स्रोतापासूनच प्रवाह म्हणजे धारा आणि धारा हा शब्द उलट वाचला की तो राधा असा होतो. जेंव्हा पाणी खाली पडते, तेंव्हा ती धारा असते, आणि जेंव्हा पाणी परत जिथून वाहायला सुरुवात झाली तिथे जाते त्याला राधा म्हणतात.

प्रश्न : प्रिय गुरुजी, माझा मुलगा २ वर्षांचा आहे, त्याला इतर लोकांबरोबर असुरक्षित वाटते. त्या वयाचा सगळ्याच मुलांना असे वाटते का? मी ते कसे हाताळावे?
श्री श्री रवी शंकर: ती लहान मुलांमधली असुरक्षितता पण असू शकते. २ वर्षांचे मूळ असुरक्षित असू शकत नाही, ते तुमचे स्वतःचे मत असू शकते. काही वेळा मुलाला काय वाटत आहे किंवा काय म्हणायचे आहे यावर तुम्ही तुमचीच मते पुढे करत राहता. विशेषकरून आजी-आजोबा असे जास्त करताना दिसतात. आजोबा म्हणतील की माजं ६ महिन्याचे बाळ मजकडे बघून मला म्हणाले, “आजोबा तुम्ही आज फिरायला जाऊ नका, आज माझाबरोबर थांबा" आणि हे ते त्याचा डोळ्यातून सांगत होते. बाळ बोलू पण शकत नाही आणि आजोबाना वाटते की ते सर्व सांगते आहे. खूप गोष्टी ही तुमची मते असतात.

तुम्हाला जर असे वाटत असेल तुमच्या मुलामध्ये ईर्ष्या आहे, भावंडाबद्दल ईर्ष्या आहे, तुम्हाला तसे वाटत असेल तर त्यांना जवळ घ्या आणि थोडे जास्त लक्ष द्या.

प्रश्न : गुरुजी मी येस + हे शिबीर २ वर्संपुर्वी केले आणि नुकतेच माझ्या आई-वडिलांना माझ्या hollow and empty या अनुभवाबद्दल आणि 'काहीच नसणे' या भावनेबद्दल सांगितले. ते म्हणतात की माझा काही उपयोग नाही. मी त्यांना काय सांगू?
श्री श्री रवी शंकर: त्यांना काहीच सांगू नको. त्यांना दाखवून दे की तू खूप काही करू शकतोस. तुझा कामाने त्यांचे मन जिंक, शब्दाने नाही.

प्रश्न : गुरुजी , लालसा दिव्य गुण कसा असू शकतो? मला तर त्यात खूप त्रास होतो.
श्री श्री रवी शंकर: तडप म्हणजेच ईश्वर!

Q: गुरुजी, मला असे वाटते की माझा सभोवताली अतिशय स्वार्थी आणि दुष्ट लक आहेत ज्यांना माझ्याकडून फक्त काम करून घ्यायचे आहे. मी माझा निर्दोष स्वभाव आणि साधेपणा कसे टिकवून ठेऊ?
श्री श्री रवी शंकर: सगळ्यात पहिल्यांदा, कुणालाही दुष्ट आणि भ्रष्ट असे नाव चिकटवू नका. तुम्ही त्यांना त्याच प्रकारे पाहाल. ते तसे असले तरी त्यांना तसे नाव चिकटवू नका. तुमचा विचार किंवा संकल्प त्यांचातले वाईटात वाईट गुण बाहेर पडू शकतात. तरीपण, जर तुमचा संकल्प चांगला असेल, तर जे वाईट आहेत त्यांचातले पण चांगले गुण दिसून येतील.

आज श्रीनगर मधल्या एका प्रशिक्षकाने मला फोन केला; त्याने ५० तरुणांचा YLTP शिबीर घेतले. तो सांगत होता की त्या तरुणांमध्ये इतका मोठा बदल झाला आहे. जिल्ह्याचे कलेक्टर निरोप समारंभाला आले होते आणि म्हणाले, " हा चमत्कार आहे. या तरुणांना काय झाले आहे? इतका मोठा बदल?”. तरुण म्हणत होते की तुम्ही याप्रकारे आम्हाला अध्यात्मिक ज्ञान या आधी कधीच दिले नाही आणि तुम्ही आम्हाला दोष देता की आम्ही हे केले न ते केले, पण कुणीही कधीही आम्हाला आत्मिक शांततेबद्दल शिकवले नाही.

त्यामुळे दुसऱ्यानमधले चांगले गुण बाहेर काढणे हे आपले काम आहे, आपण दुसऱ्यांची खूप वेळा निंदा करतो, म्हणतो की "तू निराशाजनक आहेस" पण तुम्हाला माहिती आहे की इतर काही चांगले गुणही आहेत, तुम्हाला त्यांना आशा दाखवली पाहिजे. तुमच्या आजूबाजूचा लोकांमध्ये जे दिव्य गुण आहेत ते बाहेर काढा; हे एक तुमचे विशेष कार्य म्हणून हातात घ्या. मी तुम्हाला भोळे व्हा म्हणून सांगत नाहीये. काळजीपूर्वक राहा, त्याच वेळी चांगले गुण बाहेर काढा.

प्रश्न : असे म्हणतात की आयुष्य हे चेतनेचे खेळ आणि प्रदर्शन आहे. चेतनेला हे खेळ खेळावे असे का वाटते?
श्री श्री रवी शंकर: खेळ हा स्वभाव आहे. जेंव्हा तुम्ही आनंदी असता तेंव्हा तुम्ही खेळ खेळता. जेंव्हा तुम्ही खेळता तेंव्हा तुम्हाला गरज नसते. म्हणूनच तुम्ही खेळता. तुम्हाला जर खूप गरजा असतील तर तुम्ही फक्त काम आणि कामच करता, तुम्ही खेळू शकत नाही, कळतंय का? खेळ तेंव्हाच येतात जेंव्हा मोकळा वेळ असतो. तुमचा आयुष्याचा गरजा पूर्ण झाल्यावर खेळ हा तुमच्या आयुष्याचा भाग बनतो. चेतना पूर्ण आहे आणि तिचा स्वभाव खेळकर आहे. खेळकर असणे हाच दिव्य स्वभाव आहे.

Q: गुरुजी, वातवरण हा एक महत्वाचा मुद्दा बनला आहे, त्याची काळजी घेण्यासाठी आपण काय करावे?
श्री श्री रवी शंकर: हो. वातावरणाची काळजी घेणे हा आर्ट ऑफ लिव्हिंग चा मोठा भाग आहे. झाडे लावा; प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा, जर शक्य असेल तर प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापरा. या सर्व गोष्टी माहिती करून घेण्यासारख्या आहेत. तुम्ही त्याबद्दल बेसिक कोर्स मध्ये आधीच ऐकले असेल त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे.
वातावरण स्वच्छ ठेवा, जर तुम्हाला लोक रस्त्यावर घाण करताना दिसले तर तुम्ही तिथे उभे राहा आणि लोकांना बोलावा आणि म्हणा, " आपण ही जागा स्वच्छ करूयात". असे काहीतरी करूयात. 

प्रेमाबरोबर बांधिलकी म्हणजेच भक्ती!!!

बुधवार, एप्रिल २७,२०११

मॉन्ट्रियल केंद्र कनाडा, २१ अप्रैल २०११.

प्रश्न : जेंव्हा प्रिय व्यक्तींचा मृत्यू होतो तर त्यांचा पुनर्जन्म होतो का? आपण त्यांना ओळखू शकतो का? पालकांच्या बाबतीत आपण त्यांचाशी परत संबंधित होऊ शकतो का?
श्री श्री रवि शंकर:
सर्व काही शक्य आहे! जर त्यांचा पुनर्जनम आता होतो तर तुम्ही त्यांना ओळखू शकता आणि अनुभव सुद्धा घेऊ शकता! तुम्ही हा अनुभव केलाय की तुम्ही कुठे जाता आणि कोणी व्यक्ती शी घनिष्ठ संबंध जुळून जातात? तुमचा अंतरात्मा तुम्हाला या गोष्टींचा अनुभव करून देईल. सर्व संभव आहे. कधीतरी आपण एकमेकांशी सम्बंधित होतो. पूर्वी आपण आपापसात संबंधित होतो; आता सुधा आपण एकमेकांशी संबंधित आहोत. आपल्याला हे समजो अथवा न समजो, तरी पण आपण एकमेकांशी संबंधित आहोत.

प्रश्न : आनंद काय आहे?
श्री श्री रवि शंकर :
जेंव्हा तुम्ही म्हणता, मला काही नको, तो आनंद आहे. जेंव्हा तुम्ही खुश होता आणि तुम्हाला जर हा प्रश्न विचारला की "तुम्हाला काय पाहिजे?" तुमचे उत्तर असते की "नाही, मला काही नको"

प्रश्न :प्रिय गुरूजी मी माझ्या स्वतःवर खूप संशय घेतो, मी आपले कौशल्य, योग्यता आणि निर्णय यांवर संशय घेतो. स्वतःवे संशय करण्यापासून स्वतःला कसे थांबवावे?
श्री श्री रवि शंकर :
कोणी व्यक्ती जर स्वतःवर संशय घेत असेल तर त्यावर उपाय काय? सगळ्यात पहिल्यांदा या संशयाला समजून घ्या; संशय नेहमीच कुठल्यातरी चांगल्या गोष्टीसाठी असतो. जेंव्हा तुम्हाला कोणी म्हणते, "मी तुझावर प्रेम करतो", तर तुम्ही लगेच विचाराल, "खरच?" आणि जर कोणी म्हणाले " मला तुझी घृणा येते" तेंव्हा तुम्ही विचारणार नाही "खरच" म्हणून.  म्हणूनच संशय हा नेहमी चांगल्या गोष्टींवरच असतो. तुम्ही तुमच्या योग्यतेवर संशय घेता; पण काम्जोरीन्व्र कधीही संशय घेत नाही. तुम्ही आनंदावर संशय घेता, पण दुःखावर कधीही संशय घेत नाही. ठीक आहे? कोणीही आपल्या उदास भावना किंवा निराशेवर संशय घेत नाही, परंतु म्हणतो की माझा पूर्ण विश्वास नाही की मी खुश आहे किंवा नाही. जेंव्हा तुम्ही हे समजून घेता की संशय हा नेहमी सकारात्मक गोष्टींवर असतो तेंव्हा तुमचे मन एका विशिष्ठ स्तरावर पोचते.
संशयाचा सरळ अर्थ आहे; प्राण उर्जेची कमी यासाठी अधिक प्राणायाम करा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही त्या स्थितीतून बाहेर पडला आहात.

प्रश्न : प्रिय गुरुजी भक्त कोण असतो? भक्ताने काय केले पाहिजे? भक्त कसे बनता येते?
श्री श्री रवि शंकर:
भक्त बनण्यासाठी कुठलाही अवघड प्रयत्न करू नका; प्रेमाबरोबर बांधिलकी म्हणजेच भक्ति. प्रेमाबरोबर विवेक असणे म्हणजेही भक्ती.
विवेकाशिवाय प्रेम नकारात्मकतेत बदलू शकते. आज प्रेम करा; उद्या घृणा करा; आज प्रेम करा, संबंधांबद्दल तृष्णा उद्यासाठी ठेवा.

प्रेमाबरोबर विवेक म्हणजे परमानन्द असतो; आणि तीच भक्ती आहे. भक्ति एक अतिशय मजबूत बंधन आहे, हा आपलेपणाचा अनुभव आहे. प्रत्येक व्यक्ती या गुणांबरोबर जन्म घेतो. हे परत लहान मूळ बनण्यासारखे आहे.

प्रश्न : प्रिय गुरुजी मी धन्य आहे की मी तुमच्याबरोबर आहे आणि माझा स्तनांचा कर्क रोग सुद्धा बारा होत आहे ज्याचे निदान मागच्या वर्षी झाले. तुम्ही मला आणि आम्हाला सगळ्यांना सांगू शकता का की रोगापासून काय शिकायला मिळू शकते?
श्री श्री रवि शंकर:
तुम्हाला आजारांपासून काहीही शिकण्याची आवश्यकता नाही. पुढे चला. हा जीवनाचाच हिस्सा आहे. शरीर कधी कधी आजारी पडते. हे अनेक कारणांमुळे होते. हे कर्म, पूर्व संस्कार आणि वंशपरंपरागत जीन मुळे होऊ शकते. हे प्रकृतीच्या नियमांचे उल्लंघन करण्यासारखे आहे. आवश्यकता नसताना जेवण करणे, आणि हे आत्ताच्या औद्योगीकीकरणामुळे पण होऊ शकते. याच्यामुळे अनेक विकिरण उत्पन्न होत आहेत. त्यासाठी त्यातून काय शिकता येईल याचाकडे लक्ष द्यायची गरज नाही.
फक्त एक विश्वाश, एक ज्ञान आणि एक कृतज्ञता यांचाबरोबर पुढे चला. तुम्ही आनंदी राहिले पाहिजे की आपण या ग्रहावर आहात, आणि जोपर्यंत तुम्ही इथे आहात, तुम्हाला सगळे चांगलेच करायचे आहे कारण सगळ्यांना निश्चितपणे इथून एक दिवस जायचे आहे.

प्रश्न : मला दोन सिद्धांतांचा परिचय करून दिला गेला आहे ज्यामुळे माझे गोंधळ होतो आहे; अ: मी करता नाही, ब: मला प्रत्येक लहान सहन गोष्टींची जबादारी घेतली पाहिजे माझे त्याचावर नियंत्रण नसले तरी, कृपया हे समजवा?
श्री श्री रवि शंकर :
जीवन या दोन गोष्टींचे संतुलन आहे. जबाबदारी घेणे आणि ती समर्पित करणे. आणि हे एक उत्तम संतुलन आहे. वर्तमान आणि भविष्य याची जबाबदारी घ्या आणि भूतकाळाबद्दल एक जाणून घ्या की हे असेच होणार होते आणि पुढे चला. परन्तु तुम्ही बऱ्याच वेळा याच्या विरुद्ध करता. तुम्ही विचार करता की भूतकाळ तुमची स्वतंत्र इच्छा होती आणि त्याचा पश्चात्ताप करता. आणि भविष्याला   भाग्य समजून त्यासाठी काहीच करत नाहीत. तुम्हाला माहिती आहे का की ज्ञानी लोक काय करतात? ते भविष्याला स्वतंत्र इच्छा, आणि भूतकाळाला भाग्य समजतात आणि वर्तमानात खुश राहतात. यासाठी तुम्ही तुमच्या भूतकाळाचा पश्चात्ताप करू नका आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला भविष्यात काय करायचे आहे आणि त्याचसाठी सक्रीय व्हा.  

सहजता आणि सरलता यांचा अभाव म्हणजेच अहंकार!


प्रश्न: चांगले आणि वाईट कर्मामध्ये काय अंतर आहे?
श्री श्री रवि शंकर:
कर्माला चांगले वाईट असे नाव आपण देतो. तणावातून आपण जे काही करतो ती सर्व वाईट कर्मे आहेत. प्रसन्न चित्ताने जे काही कराल ते सर्व चांगले असते. एक गोष्ट आहे- बोधिसत्व चीनला गेले. तेंव्हा चीनचा चक्रवर्ति राजा स्वागत करण्यासाठी आला, म्हणाला " आम्ही इतके तलाव बांधले आहेत, इतके सगळे केले आहे, अन्न दान केले आहे, हे केले आहे, ते केले आहे." हे सर्व ऐकल्यानंतर बोद्धिसत्व ने म्हणाले की तू नरकात जाशील. हे काय चांगले कर्म आहे!  का? मी करत आहे. मी करता आहे! हे सगळे करता भावाने केले आहे. तणावातून केले आहे. अहंकाराने केले आहे. तेंव्हा ते चांगले कर्म असले तरी ते वाईट कर्म बनते.

प्रश्न: गुरुजी अहंकार काय आहे आणि त्याला कसे नष्ट करता येईल?
श्री श्री रवि शंकर
: स्वतःला या सगळ्या गोष्टींपासून वेगळे मानणे म्हणजे अहंकार. इतरांपासून स्वतःला वेगळे मानणे. मी खूप चांगला आहे, सगळ्यांपेक्षा चांगला आहे किंवा वाईट आहे. दोन्ही अहंकार आहे. आणि अहंकार तोडायचा प्रयत्न पण करू नका. असे वाटते, त्याला राहू देत. जर असे वाटत असेल की मला अहंकार आहे तर म्हणा ठीक आहे, माझा खिशातच राहा! काही प्रोब्लेम नाही! ते आपले आपण सहज होऊन जाईल. सहजतेचा अभाव हाच अहंकार आहे. सरलतेचा अभाव हाच अहंकार आहे. आपलेपणाचा अभाव अहंकार आहे. आत्मीयता असल्याचा अभाव अहंकार है. आणि याला तोडण्यासाठी सहजता, आत्मीयता, आपलेपणा, सरलता या गोष्टी जीवनात आणाव्या लागतील

प्रश्न: जर कुणा जवळच्या व्यक्तीचे निधन झाले तर त्यांच्या आत्म्याच्या शांती साठी काय करू शकतो?
श्री श्री रवि शंकर
: तुम्ही शांत व्हा. जसे तुम्ही शांत व्हाल, प्रेमाने पूर्ण होता, भजनामध्ये एक होता, ज्ञानात एक होता, ज्ञानात राहता, तेंव्हा जे लोक पलीकडे गेले आहेत त्यानाही खूप छान वाटते. आत्ता आपण इथे बसून ध्यान करत आहात, केले आहे, सगळ्याचा परिणाम फक्त तुमच्यावर नाही तर त्यांचावारही आहे जे पलीकडे पोचले आहेत.

प्रश्न: आपण आपली सहनशीलता कशी वाढवू शकतो?
श्री श्री रवि शंकर
: परत तीच गोष्ट! माझ्यात सहनशीलता नाही हे जेंव्हा मानून चालतो तेंव्हा ते तसेच होते. माझी आज्जी नेहमी म्हणायची की कुठलीही गोष्ट नाकारात्मक बोलु नये. का? ती म्हणायची की काही देवता घरात असतात त्यांचे नाव आहे वास्तू देवता. तुम्ही काही म्हणाला त्याला ते तथास्तु म्हणतात. समजून चला की घरी मिठाई नाही तर मिठाई नाही असे कधीही म्हणायची नाही. म्हणायची की बाजारात भरपूर मिठाई आहे, चला बाजारात जाऊयात. शब्दांमध्येही ती कधीही नाही म्हणायची की मिठाई संपली आहे. म्हणाल तर माहिती नाही की कुठे वास्तू देवता असेल आणि तथास्तु म्हणेल. मग सगळे संपलेलेच असेल. याच प्रकारे जर काजू हवे असतील तर बाजारात काजू भरलेले आहेत, बाजारात चला.
त्या पिढीतल्या लोकांच्या मनात किती विश्वास होता.आणि ही गोष्ट खरी पण आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही हे खरे आहे. आपण ज्याला ण समजत मानतो, ते तसेच होते. आभावाला मानल तर अभाव राहतो. खूप लोक म्हणतात की पैसे नाहीत तर वास्तू देवता लगेच तथास्तु म्हणते.  जे आयुष्यभर ' नाही नाही' चे गाणे लावतात, ते कधीच तृप्त नसतात. एक समृद्धि चा अनुभव करा. माझ्या जवळ सर्व काही आहे. मग तुमच्याजवळ सर्व गोष्टी यायला लागतील. माझ्या जवळ नाही, माझ्यात प्रेम नाही मग तसेच वाटायला लागते. मी खूप प्रेमळ आहे. समजून चला, तेंव्हा मनात प्रेमच झळकेल.

एक अतिशय कंजूस व्यक्ति माझ्याजवळ येते तर मी बोलतो की तू किती उदार आहेस. तेंव्हा एक जण माझ्याजवळ येऊन म्हणाले  "गुरुजी तुम्ही नेहमी म्हणता की मी उदार आहे. मी कुठे उदार आहे? मी किती कंजूष आहे. मी माझ्या पत्नीला दहा रुपये सुद्धा खर्चू देत नाही. तुम्ही मला उदार कसे म्हणू शकता? मुले काँगेस प्रदर्शनात जातात तेंव्हा एक-दोन कैन्डी विकत घ्यायला पण मला त्रास होतो. मी एकच मिठाई घेऊन देतो, आणि तुम्ही मला उदार म्हणता.
कारण तू उदार बनावे.
ज्या भावना तुमच्या मनात आणायची इच्छा होते, ते मानून चाल, ते आपलेच आहे. त्याला नाही असे मानून चालला तर नाही होणार.
हे लक्षात ठेवा, " काजू भरलेले आहेत, बाजारात जाऊयात!"

प्रश्न: गुरुजी, लग्नात प्रेम असून सुधा इतकी भांडणे का होतात?
श्री श्री रवि शंकर
: काय म्हणायचे? मला तर काहीच माहिती नाही! माहिती करून घ्यायची चेष्टा पण केली नाही! होऊ शकते की काही जोड स्वर्गात बनले तिथे थकले आणि मग नरकात उतरले, किंवा असेही असेल की नरकातल्या विशेष भागात आले.
पहा, प्रत्येक संबंधांमध्ये कुठे ना कुठे, कधी ना कधी, काही ना काही गडबड ही होताच असते आणि ते ठीक पण होते. तेंव्हा प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःच्या मनाला समजावा, संभाळा, त्याने सर्व गोष्टी ठीक होतील. कधी ना कधी गोष्टी ठीक होतातच.

परदेशात अजूनही एका देशात ८२ वर्षाचा पुरुषाने, ८० वर्षाच्या आपल्या पत्नीवर कोर्ट केस केली. घटस्फोट घेतला ८० वर्षानंतर. ४० वर्ष एकसाथ राहिले दोघे. शेवटी केस का केली? ज्या खुर्चीवर तो रोज बसायचा, पत्नी ती देत नव्हती! सोडायला तयार नव्हती! बाकी प्रत्येक गोष्टीचे दोन भाग झाले, खुर्चीची गोष्ट घेऊन कोर्टात एव्हडी मोठी केस झाली! माणसाचा मेंदू खूप विचित्र आहे! ज्याचाशी मैत्री करतो त्याचाशी भांडण करतो. आणि ज्याचाशी भांडतो परत त्याचाशीच मैत्री करण्यासाठी तडफडतो. 

तर हे जीवन खूप जटील आहे, आणि जटिल जीवनात हसत हसत निघून जाणे हीच बुद्धीमानी आहे. फक्त व्यक्तिलाच पाहत बसाल तर अज्ञानात राहाल. व्यक्ती नाही व्यवहार होतो. व्यक्तीच्या मागे जी चेतना आहे, सत्ता आहे, त्याला पाहाल तर ती एकच चेतना आहे - या व्यक्ती कडून असे करून घेतले, त्या व्यक्तीकडून तसे करून घेतले. अशा प्रकारे व्यक्तीच्या मागे जी चेतना आहे, जीचामुळे सर्व होते, त्याला ओळखणे हेच ज्ञान आहे. समजलात का?

आपण सगळ्यांना पाहाल तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काय आहे  Hollow and Empty. आणि जसा विचार आला तसा त्यांनी काही व्यवहार केला. त्यांची काय चूक.

प्रश्न: गुरु आणि ऋषिकडून काही मागितले पाहिजे का?
श्री श्री रवि शंकर
: हे तर मागितलेच. काही उत्तर तर मागितलेच आहे. जेंव्हा मागणी येते तेंव्हा ती आल्यावरच तुम्ही विचार करता की मागू की नको.आली मागणी. तहान लागली तर पाण्याची मागणी येते. पाण्याचा मागनिलाच तहान म्हणतात. भूक म्हणजेच जेवणाची मागणी. मागणी स्वाभाविक आहे. मागणी आल्यावरच कळते की मागणी आली. काय? नाही? आता करावे न करावे - गोष्टच नाही. करून टाकले. करूनच समजेल की केले. केल्यानंतरच कळले की मी मागितले आहे. ती खरी मागणी जी आतून आली आहे, खोलवरून, आवश्यकता आहे. आशी आवश्यक मागणी पूर्ण होणारच आहे. पूर्ण होते.

प्रश्न: बेसिक कोर्स सांगतात, "जो जसा आहे तसे त्याचा स्वीकार करा." याचा अर्थ असा आहे की भ्रष्ट नेत्यांचा पण स्वीकार करायचा जे आपल्या देशाला विकायला बसले आहेत ?
श्री श्री रवि शंकर
: तीन प्रकारच्या दक्षता समजून घ्या- शारीरिक, वाचिक और मानसिक - कृत्यात, वाणीत आणि भावनांमध्ये. जसे काही लोक करतात- बोल्त खूप चांगले, गोड गोड पण कामाची वेळ येईल तेंव्हा काम नाही करणार. हे काय? वाणी तर ठीक आहेत पण कृत्या मध्ये नाही. खूप लोकांचे मन खूप साफ आहे ते भावनेमध्ये ठीक आहे , पण जसे तोंड उघडतील तसे आग ओकू लागतात. समाजात ही खूप मोठी समस्या आहे. व्यक्ती चांगल्या आहेत, काम पण चांगले करतात, पण जसे तोंड उघडतात तसे लोकांना वाटते की कान बंद करावेत. काही लोक काम ठीक ठीक करतात पण बोलत नाहीत. आणि काही लोक काम ओं ठीक करतात, बोलतात पण ठीक आणि मन मात्र ठीक नसते, भावना ठीक नसतात. खूप कमी लोक मिळतील ज्यांचे भाव, वाणी आणि कृत्य पण शुद्ध आहे. किती वेळा आपण टेलर ला कपड़े देतो तो चांगली चांगली गोड गोड गोष्टी करेल, दिवाळीच्या एक दिवस आधी या, देऊन टाकू! त्यांचा मनात काही चुकीची भावना नसेल, त्यांच्या मनात खोटे बोलणे किंवा धोका देणे या भावना नसतील - भाव ठीक असेल, वाणी ठीक असेल, पण कृत्यामध्ये गडबड. काही लोक आपल्या कृत्यात गडबड करतात. बोलतात चांगले, भाव पण ठीक आहे पण तुम्ही लोक असे समजत की त्यांनी जाणून बुजून केले - तेंव्हा तुमचा भाव गडबड झाला. त्यांचे कृत्य गडबड झाले आणि तुमचा भाव गडबड झाला. तुम्ही दोगेही एकच बोटीत आहात. तिन्हींची शुद्धि पाहिजे - वाणी शुद्ध पाहिजे, कृत्य शुद्ध पाहिजे आणि भावनेची शुद्धी पाहिजे. तेंव्हाच सिद्ध व्हाल  - Perfection.

महिला दिन विशेष

बंगलोर, मार्च ८,२०११

प्रश्न: कृपया अर्धनारीश्वर या संकल्पनेबद्दल विस्तारित स्वरुपात सांगा.
श्री श्री रविशंकर: सगळ्यांमध्ये स्त्री आणि पुरुषाची गुणसूत्रे असतात. तुम्ही तुमचे आई व वडील दोघांपासून बनले आहात. तुम्ही अर्धे आई व अर्धे वडील यांपासून बनले आहात. दिव्यातेमध्ये स्त्री व पुरुष दोहोंची तत्वे आहेत. हे खूप आधी समजले होते आणि अर्धनारीश्वर च्या रुपात दाखवले होते.भगवान फक्त पुरुष किंवा महिला नाही - अर्धनारीश्वर आहे. सृष्टिमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही तत्व आहेत.

देवी दुर्गा वाघावरून येते ; दुर्गा आई आहे, जी किती सौम्य  करुणामयी आहे, तरीसुद्धा वाघावर बसते जो अतिशय क्रूर आहे. हा किती मोठा विरोधाभास आहे.! विरोधाभासी मूल्य एक दुसऱ्याला पूरक आहेत आणि प्राचीन लोकांना याची माहिती होती. वैज्ञानिक दृष्टिकोण पाहता जर एक जरी जनावर लुप्त झाला तर सृष्टी टिकू शकत नाही. प्रत्येक जनावर पृथ्वीवर तरंगाच्या रुपात विशिष्ठ उर्जा आणत असतो. वाघ दुर्गा देवीच्या स्पन्दनाना पृथ्वीवर आणतो.

देवी सरस्वतीला अनेक हात दाखवले आहेत! एका हातात जप माला आहे जे ध्यान दाखवते, त्यांच्या दूसऱ्या हातात पुस्तक आहे,जो बौद्धिक ज्ञान दाखवते आणि एका हाताने वीणा वाजवताना दाखवले जाते. म्हणूनच जेंव्हा बौद्धिक ज्ञान, संगीत और ध्यान एकत्र असतात तेंव्हा ज्ञानाच उदय होतो. लाखो हजार वर्षांपूर्वी हे ज्ञान होते. देवी सरस्वती एका दगडावर बसली आहे, याचा अर्थ असा आहे की जेंव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्ती होते तेंव्हा ते तुमच्यामध्ये खोलवर जाऊन बसते. देवी लक्ष्मी कमलावर बसली आहे, याचा अर्थ असा की लक्ष्मी चंचल आहे. धन अस्थिर असून गतीवान आहे आणि गतीवान असला पाहिजे.

प्रश्न: स्त्री साथी लग्न करणे महत्वपूर्ण आहे का? देवानेच तिची काळजी घ्यावी हे ठीक नाही का? आई न बनता सुद्धा ती परिपूर्ण आहे का?
श्री श्री रविशंकर: तुम्ही सर्व जगाची आई असल्याचा अनुभव घेऊ शकता, आई पानाचा भाव हा प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक स्वभाव आहे, त्यामुळेच करुणा, प्रेम आणि ओढ आहे.
 विवाह केला पाहिजे अथवा नाही हा व्यक्तिगत निर्णय आहे. आनंदी राहणे सगळ्यात महात्व्चे आहे. हे माझे मत आहे. असे किती आहेत जे अविवाहित आहेत आणि खुश आहेत, आणि असे किती आहेत जे विवाहित आहेत परन्तु खुश नाहीत आणि याच्या विरुद्ध पण आहे. निवड तुमची आणि आशीर्वाद माझे!

प्रश्न: जेंव्हा घरातल्या मोठ्या व्यक्तीच परंपरा आणि पारंपारिक मूल्यांना विसरले आहेत तेंव्हा मी घरातील एक स्त्री म्हणून की करू शकते?
श्री श्री रविशंकर: तुम्हाला जे काही शिकायचे आहे ते तुम्ही इंटरनेट वर शिकू शकता. हे किती अद्भुत युग आहे, एका लैपटोप वर गूगल वर शोधून पृथ्वीवर उपलब्ध असलेली कुठलीही माहिती सहजतेने उपलब्ध होऊ शकते. सर्व सूचना हाताच्या बोटांवर उपलब्ध आहेत. मी नेहमी सांगायचो की ज्ञान हातच्या बोटांवर उपलब्ध होईल आणि जे मला ऐकायचे त्यानाही माहित नव्हते की मी असे का सांगत आहे. सर्व माहिती याने उपलब्ध आहे. मी त्याला ज्ञान तर नाही म्हणणार पण माहिती  म्हणू शकतो. 

प्रश्न: कधी पुरुष दिवस पण असेल का?
श्री श्री रविशंकर: (हसून) त्यसाठी सुद्धा देवी ची (स्त्री जाति) प्रार्थना करावी लागेल.
राक्षस आणि देवता सिद्ध त्यांचाकडे वरदान मागत असत. कोणी गम्मत करताना सांगत होते की :एकदा एका माणसाने कुणाला तरी विचारले की या घराचा मालक कोण आहे, ती व्यक्ती म्हणाली की माझा बायकोला विचारून सांगतो!

प्रश्न: कुठलेही लक्ष प्राप्त करण्यासाठी मानवा मध्ये कुठले ८ महत्वपूर्ण गुण पाहिजेत?
श्री श्री रविशंकर: त्या संख्येला फक्त ८ वरच का थांबवत आहात ? तुम्हाला त्या ८ ची यादी हवी की की त्या ८ चा विस्तार. यावर विचार करूयात.
सगळ्यात पहिले तर लक्ष ठरावा. मन इतके चंचल आहे, यासाठी लक्ष ठरवणे महत्वपूर्ण आहे. नंतर तुम्हाला त्यासाठीचा वेळ मर्यादा ठरवायला लागेल. नंतर त्याचा अनुकूल आणि प्रतिकूल परिणामांचा अनुमान लावणे आणि परिस्थितीनुरूप बदलायची तुमची क्षमता वाढवायला लागेल. लक्ष पूर्ती साथी लागणारी साधणे गोळा करणेही सगळ्यात महत्वपूर्ण आहे.

प्रश्न: स्त्री आणि पुरुषांसाठी आध्यात्मिक मार्ग भिन्न आहेत का?
श्री श्री रविशंकर: नाही. आध्यात्म महिला आणि पुरुष दोघांसाठी समान आहे.
इतिहासात काही काळासाठी पुरुषांनी महिलांवर काही निर्बंध लावले होते, ज्यामुळे महिला सत्तेमध्ये येऊ शकल्या नाहीत. परन्तु समाजाचे काही कायदे असतात आणि प्रत्येक व्यक्तीने त्यांचे पालन केले पाहिजे.

प्रश्न: मृत्यु आणि पुनर्जन्म यांच्या मधल्या वेळात की होते ?
श्री श्री रविशंकर: निद्रा अवस्थेतून जाग्रित अवस्थेमध्ये तुम्ही येत तेंव्हा काय होते? तसेच होते- तुम्ही निष्क्रिय होता. जेंव्हा वेळ येते तेंव्हा चेतना परत येते.

प्रश्न: आपल्या महाकाव्यांमध्ये महिलांनी अनेक असाधारण काम केले आहेत, ज्यावर विश्वास करणे कठिण आहे! तुम्ही यानाद्दल काही सांगा.
श्री श्री रविशंकर: उदाहरण घ्यायचे झाले तर आपण गांधारी बद्दल boluyat, तिने मदक्यान्मधून १०० मुलांना जन्म दिला आहे. वास्तवाट त्यांनी टेस्ट ट्यूब बाळांना जन्म दिला. एक भ्रूण आणि १०० मडकी! आपल्याला तेंव्हाही यामागचे विज्ञान माहिती होते !
जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ते केवळ तथ्य असते. जसे कोणीही विश्वास ठेवत नाही की डायनासोर होते परन्तु त्यांच्या असण्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. जटायु एक डायनासोर पक्षी ज्यावर सीतेने सवारी केली होती. भगवान श्री कृष्ण च्या आस्तित्व बद्दल सुद्धा पुरावे आहेत. त्याला ज्याप्रकारे पुढे आणले जाते ते बऱ्याच वेळा कल्पना आणि  तथ्य यावर आधारित असते. जसे कुठल्या कवितेमध्ये कल्पना आणि तथ्य यांचे मिश्रण असते. जर तुम्ही अब्दुल कलाम ,जवाहरलाल नेहरु किंवा इंदिरा गाँधी यांच्या आयुष्याबद्दल वाचाल तर तुम्हाला कळेल की, त्यात कित्येक गोष्टी जोडल्या जातात.

प्रश्न: वर्तमान क्षणात आणि प्रभावकारी राहण्यासाठी मला काय केले पाहिजे?
श्री श्री रविशंकर: तुम्ही आत्ता ठरवत आहात की भविष्यात वर्तमान क्षणात राहण्यासाठी तुम्हाला काय केले पाहिजे! तुम्हाला कळते आहे की मी काय म्हणत आहे?

प्रश्न: कृपया आध्यात्म आणि साम्यवाद यातील सामानातेबद्दल सांगा?
श्री श्री रविशंकर: हाँ, साम्यवाद म्हणतो की सर्वाना समा संधी मिळाली पाहिजे. आध्यात्म म्हणते की दिव्यता सगळ्यांमध्ये आहे आणि प्रत्येक जण ईश्वर आहे. अशाप्रकारे दोघेही एकच गोष्ट सांगतात. तुमच्या भावना समान असतील पण अभिव्यक्ति वेगवेगळी असू शकते. तुम्ही प्रेम वेगवेगळ्या रुपात अभिव्यक्त करता जसे की एखादे लहान मूळ अथवा वृद्ध यांच्या बद्दल वेगळे प्रेम असते.

(गंगा अशी नदी आहे की जिचा निर्माण प्राचीन लोकांनी केला – http://www.bharathgyan.com/ वेब साईट वर भागीरथी बद्दल तथ्य आणि गोष्टी आहेत की कसे संतानी आणि त्यांचा सहकार्यांनी त्याची संरचना केली आणि कसे मानसरोवर चा प्रवाह पश्चिम दिशेकडून केला.

प्रश्न: मानसिक रूपाने विक्षिप्त असलेल्या लोकांबरोबर कसे राहावे याबद्दल सांगा?
श्रीश्री रविशंकर: ते लोक इथे सेवा घेण्यासाठी आले आहेत, त्यांची सेवा करा!!!

जीवन साथी

सोमवार, ऑगस्ट , १६, २०१०


"हा ग्रह आपले घर आहे हे आपण जागे होऊन बघितले पाहिजे"

आधीच्या पोस्ट वरून पुढे...


प्रश्न : गुरुजी, माझ्यामध्ये एक वर्षाचा संकल्प घेण्याची क्षमता नाही. मी काय करू?
श्री श्री रवि शंकर :
क्षमता नाही? एक एक दिवसाच्या संकल्पाने सुरुवात करा. एक दिवसाचा जरी संकल्प करू शकलात तरी ते पुरेसे आहे. तुम्ही रोज असे करा. असा विचार नका करू की, "अरे देवा, मला आता एक वर्ष भर हे करायचे आहे.’ आज मी करत आहे– हे चांगले आहे. उद्या करेन - हे चांगले आहे.



प्रश्न : प्रिय गुरुजी, मी खूप प्रार्थना केली होती की या आठवड्यात तुम्ही इथे यावे. तुम्ही इथे आलात यासाठी मी आभारी आहे. प्रार्थनेबद्दल काही सांगा.
श्री श्री रवि शंकर :
जेंव्हा तुम्हाला खूप आभारी वाटत असते किंवा लाचार वाटत असते, तिथे प्रार्थनेचा जन्म होतो. प्रार्थनेचा उदय होण्याचे तिसरे कारण असे आहे की जेंव्हा तुम्ही ज्ञानात स्थित होता. तेंव्हा तुम्हाला दिसते की चेतनेचा विस्तार झाला आहे, चेतनेच्या एका नव्या आयामात तुम्ही पोचला आहात, की जो पूर्ण आहे, अंतर्ज्ञान, ज्ञान आणि प्रेमाने भरलेला आहे.



प्रश्न : कृपया नात्यांबद्दल सांगा. बऱ्याच वेळा ती इतकी अवघड का होतात?
श्री श्री रवि शंकर :
तुम्हाला परत एकदा ‘Celebrating Love’ हे पुस्तक वाचले पाहिजे. तुम्हाला की वाटते की नात्यांमध्ये अडचणी का येतात?



प्रश्न : मला माझ्या भावना व्यक्त करता येत नाहीत. उलट जेंव्हा मी माझ्या भावना लपवतो तेंव्हा मला ताण येतो. मला कळत नाही की या परिस्थितीतून मी कसा बाहेर पडू. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ध्यान करून सुद्धा मनाला रिकामे करणे अवघड आहे का?
श्री श्री रवि शंकर :
जर तुमच्या डोक्यात खूप विचार येत असतील, तर त्यामागे काही करणे आहेत. एक कारण तर असे आहे की पोट साफ नसणे, पोटाला तडस लागणे, असे असेल तर मनात खूप विचार येतात. जर शरीरात रक्त प्रवाह नीट नसेल तरी पण खूप विचार येतात.  हो की नाई? तर, योगासन आणि प्राणायाम केल्याने तुम्हाला मदत मिळेल. योग्य आहार केल्याने मदत मिळेल. आयुर्वेदिक डौक्टरना दाखवा. तो सांगेल, जर शरीरात पित्त जास्त झाले असेल तर त्यानुसार योग्य जेवण केल्याने मदत मिळेल.



प्रश्न : ज्या लोकांमध्ये आक्रमकता, ईर्ष्या आणि असंतुलन  अशा नकारात्मक प्रवृत्ती असलेल्या लोकांबरोबर काम कसे करायचे?
श्री श्री रवि शंकर :
कौशल्याने. त्यांच्या वागण्यावर प्रतिक्रिया देताना कारुण्याचा उपयोग करा आणि बघा की तुम्ही त्यांच्या बरोबर कसे काम करू शकता. हां? यातून पहिली गोष्ट अशी होईल की तुमचे कौशल्य वाढेल. दुसरी गोष्ट अशी की धैर्य वाढेल. तीसरी गोष्ट अशी की तुम्हाला कळेल की ती व्यक्ती नेहमी ईर्ष्यापूर्ण किंवा रागात नसतो. तो पण बदलतो. तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल की लोक कसे बदलतात.



प्रश्न : लहान मुलांसारखे होणे आणि जबाबदारी घेणे यात काय साम्य आहे?
श्री श्री रवि शंकर :
तुम्ही जबाबदारी घेता ही एक गोष्ट झाली. लहान मुलासारखे होण्याने जबाबदारी घेण्याला काही फरक पडत नाही. उलट यामुळे जबाबदारी घेण्याला मदत मिळते.



लहान मुलासारखे होणे आणि लहान मूल होणे यात फरक काय आहे? लहान मूल झाल्यावर तुम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही. लहान मुलासारखे होऊन जबाबदारी घेता तेंव्हा तुम्ही नैसर्गिक राहता, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून घेता, सगळ्यांकडून प्रतिक्रिया मागता, आणि जर कुठली प्रतिकूल प्रतिक्रिया असेल तर तुम्ही त्यामुळे चिंतेत पडत नाही, त्याचा सामना करता. जर ते योग्य असेल तर त्याचा स्वीकार करा, जर निरर्थक असेल तर स्वतःचा तोल न ढळू देता त्याकडे दुर्लक्ष करा.


प्रश्न : आपण आपल्या ग्रहासाठी काम करणे किती आवश्यक आहे?आपण की करू शकतो? आपण हे सगळे कसे टिकवून ठेवू शकतो?
श्री श्री रवि शंकर
: आपल्याला या गोष्टींबद्दल जागरूक राहायला लागेल की हा ग्रह म्हणजे आपले घर आहे. जेंव्हा आपण वरून पाहतो तेंव्हा आपल्याला देशांच्या सीमा दिसत नाहीत. सीमा रेषा या आपल्या समजुतीच्या सीमा रेषा आहेत, आपला भ्रम आहे. खरे तर कुठलीच सीमा रेषा नाही. आकाशाला सीमा रेषा माहित नाहीत. ढगांना पण या सीमा कळत नाहीत. हवेला कुठलीही सीमा नाही. या पृथ्वीचे पाचही तत्व सीमा रेषा मनात नाहीत. हा ग्रह सगळ्यांचेच घर आहे. आपण सगळे एकच कुटुंब आहोत, यासाठी आपल्याला बृहद दृष्टिकोण ठेवायला पाहिजे. योग्य दृष्टिकोण काय आहे? तर हा पूर्ण ग्रह आपले घर आहे.



आपण आपला परमाणु कचरा इथे तिथे फेकू शकत नाही. जगात कुठेही ती जागा असो, परत आपल्याकडेच ते पोचेल! आपण कुठलीही एक जागा सीमाबद्ध करून साफ नाही ठेवू शकत. हे शक्य नाही. आपल्याला पूर्ण ग्रहाची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला पूर्ण जगाला जैविक शेतीकडे घेऊन गेले पाहिजे. जेंव्हा जेवण किंवा पीक पिकवण्याची वेळ येते तेंव्हा आपण हे नाही सांगू शकत की ' ठीक आहे, मी केवळ इथेच जैविक शेती करेन, बाकी जगात प्रदूषण होऊ देत!' कारण हवेतून सगळीकडे प्रदूषण पोचणार आहे! आपण निसर्गामध्ये ढवळाढवळ करून खूप व्हायरसना जन्म दिला आहे. आपण पृथ्वीवरचे कित्येक जीव नष्ट केले आहेत. आपण पृथ्वीची काळजी नाही केली, की ज्यामुळे अन्नाचे उत्पन्न खूप कमी झाले आहे. येणाऱ्या पिढ्यांना यामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागणार आहे.


मला असे वाटते की या ग्रहावर प्रत्येक व्यक्तीला पृथ्वी प्रदूषण मुक्त करण्याची, पृथ्वी टिकवून ठेवायची आणि तिचा विकास करायची, जलाशय तसेच पाण्याचे रक्षण करणे व जास्तीत जास्त झाडे लावणे याची जबाबदारी घ्यायला लागेल. हे खूप आवश्यक आहे!


जगाची अजून एक मोठी समस्या आहे ती महणजे पाण्याची कमतरता. लाखो लोक उपासमारीच्या टोकावर आहेत. आपल्याला पूर्ण जगाकडे लक्ष ठेवून त्याची काळजी घेतली पाहिजे. हां, आपल्याला आपले घर, आपला शेजार पाजार, जिथे आपण राहतो तिथली काळजी तर घेतलीच पाहिजे. हे सगळ्यात जास्त जरुरी आहे, पण त्याच बरोबर ही पण काळजी घेतली पाहिजे की या ग्रहावरचा प्रत्येकजन या कुटुंबाचा एक भाग आहे.


प्रश्न : हे शक्य आहे का की आपण प्रेम पण करावे आणि आतूनही मजबूत राहू, प्रेम पण करू आणि तर्कसंगत पण राहू, प्रेम करूनही वैराग्यात पण राहू, प्रेम भी करूनही ईर्ष्या आणि परिग्रह यापासून दूर राहू?
श्री श्री रवि शंकर : नक्कीच. जर ज्ञान असेल तर हे शक्य आहे की तुम्ही प्रेम पण करू शकाल आणि या नकारात्मक भावनांपासून दूर राहाल. भावनांपासुन दूर राहाल. ज्ञानाबरोबर प्रेम असणे आनंददायक आहे. जर प्रेमाबरोबर ज्ञान नसेल तर तुम्ही सांगितले ते सर्व होते – ईर्ष्या, लालच, इत्यादि।


प्रश्न : प्रिय गुरुजी, आपण मला मार्गदर्शन कराल का - मी ज्या व्यक्तीवर एक वर्षापासून प्रेम करते ती व्यक्ती माझासाठी योग्य आहे का?
श्री श्री रवि शंकर :
तुम्ही जेंव्हा एखाद्यावर गाढ प्रेम करता तेंव्हा ती व्यक्ती तेव्हाद्यापुरती ठीक असेल. पण भविष्यातही ठीक असेल हे कोणी सांगू शकत नाही. हे तुमच्यावर आहे की ती परिस्थिती तुम्ही कशी संभाळाल. तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर आधी हे माहिती करून घ्या की की तीव्याक्ती पण तुमच्यावर प्रेम करते की नाही. जर ती व्यक्ती पण तुमच्यावर प्रेम करत असेल तर दोघांनी मिळून ज्ञानात राहून पहा की हे प्रेम टिकवून कसे ठेवायचे– पुढे कसे जाल, कसे वागला, इत्यादी, ठीक आहे!



प्रेमाची सुरुवात खूप सरळ असते, पण खूप लोक हे प्रेम टिकवून ठेवू शकत नाहीत.
जर कोणी तुमच्यावर प्रेम करत असेल आणि जर तुम्हाला त्याचा योग्य पद्धतीने स्वीकार करता आला नाही, त्याला वाढवता आले नाही तर तुम्ही ते घालवून बसता. ‘Celebrating Love’ या पुस्तकात मी त्या कौशल्याबद्दल सांगितले आहे, की ज्यामुळे तुम्ही प्रेम टिकवून ठेऊ शकता.

चांगले वाईट गोष्टी एकत्र असणे हेच जीवन आहे

प्रश्न : गुरुजी ह्या विश्वात आत्म्यांची संख्या ठराविक आहे का कि संपूर्ण ब्रम्हांडात एकच अंतरात्मा आहे.
श्री श्री रवी शंकर : अनंत आत्मे. हे असे विचारण्यासारखे झाले कि आकाशात ठराविक संख्येने तारे आहेत का? वैदिक शास्त्र आणि आगम शास्त्र असे सांगते कि २२४ पृथ्वी आहेत , आपल्यासारखे जग आकाशगंगेत आहेत. तसे बघितले तर खूप आहेत पण महत्वाचे २२४ आहेत. हि आपल्या संतांची दूरदृष्टी आहे कि ज्यांनी ध्यानात गहिरे जाऊन ब्रम्हांडाचा शोध घेतला आहे.

प्रश्न : गुरुतत्त्व म्हणजे काय ,आणि गुरु कोण आहे?
श्री श्री रवी शंकर : विवेक, तारतम्य हे गुरुतत्त्व आहे. गुरु कोण आहे हे खरच महत्वाचे आहे का? तुम्ही फक्त ज्ञान घ्या आणि पुढे चला हेच पुरेसे आहे. गुरु कोण आहे ह्याची काळजी करू नका.

प्रश्न : गुरुजी आत्मबल कसे वाढवावे?
श्री श्री रवी शंकर : आत्मबल....प्रार्थना, प्राणायाम, आणि साधना करा.

प्रश्न : गुरुजी , हे जग स्थायी आहे कि बदलत आहे?
श्री श्री रवी शंकर : तुम्ही बघता आहात कि हे जग स्थायी नाही.

प्रश्न : जर शिष्याचेच निधन झाले तर सत्गुरूचा काय उपयोग?
श्री श्री रवी शंकर : सत्गुरुला माहित असते कि शिष्याला मरण नाही. कारण आत्मा अमर आहे. मरणानंतर सुद्धा त्याचा एका दिशेने प्रवास हा सुरूच असतो.

प्रश्न : गुरुजी अश्वमेध म्हणजे काय?
श्री श्री रवी शंकर : अश्वमेध म्हणजे शुद्ध. 'श्व' म्हणजे भूत किंवा भविष्य. 'अश्व' म्हणजे उपस्थित क्षण आहे. 'मेध' म्हणजे मार्जन होय. मनाचे आणि बुद्धीचे मार्जन जेव्हा आत्ताच्या म्हणजेच उपस्थित क्षणात होत असते तेव्हा त्याला अश्वमेध म्हणतात. बुद्धी आणि मन आत्ताच्या क्षणात ठेवा.

प्रश्न : गुरुजी कोदागणं कोळी नुन्गीथा (क्न्नादामाध्ले एक भजन)
श्री श्री रवी शंकर: ह्याचा अर्थ खूप अदभूत आहे.मी विचार करत होतो कि मी खूप मोठा माणूस आहे पण मी जेव्हा माझ्या गुरूच्या चरणांकडे पहिले तेव्हा उदार्चारीत , मोठ्या मनाचे दिसले .माझा अहंकार कि जो मला खूप मोठा वाटत होता तो गुरुचे चरण लहान वाटत होते. पण खरं तर त्याच्या अगदी विरुद्ध होत.
त्यांच्या चरणांनी माझा मोठा अहंकार गडप करून टाकला.

प्रश्न : आम्ही फक्त चांगल्या गोष्टी लक्षात ठेवून वाईट गोष्टी कश्या विसराव्यात?
श्री श्री रवी शंकर : हे खूप चांगले आहे कि वाईट गोष्टी विसराव्यात आणि चांगले आहे कि चांगल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. दोन्ही एकत्र असणे हेच जीवन आहे पण आपण त्याचा विसर पडतो आणि आपण फक्त वाईटच गोष्टी लक्षात ठेवतो. तुम्ही सत्संग मध्ये जे ऐकता ते लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. इतर लोकांच्या चुका विसरणे हि खूप महत्वाची बाब आहे. पुन्हा पुन्हा त्याच चुका करू नयेत हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. इतर लोकांच्या चुकांवरून आपण शिकणे हेही महत्वाचे आहे.

प्रश्न : गुरुजी स्त्री साठी एखादी गोष्ट नीट रचणे कठीण असते कारण तिला संपूर्ण घराला सांभाळायचे असते. हि गोष्ट ती इतक्या क्षमतेने कशी करू शकते?
श्री श्री रवी शंकर : कुठलीही गोष्ट कठीण आहे असा विचार करू नका. जरी ती कठीण असली तरी तुमच्या मनातल्या विचाराने ती आणखीन कठीण होते. जर तुम्हाला एखादे कठीण काम नेमून दिले तरी हे माना कि तुमच्यात खूप शक्ती आहे अगदी त्याच्याहीपेक्षा जास्त. आपल्यासाठी तेच काम उपलब्ध होते जे आपण करू शकतो.

प्रश्न : गुरुजी एक स्त्री ब्रह्मचर्याचे पालन करू शकते का?
श्री श्री रवी शंकर: ब्रह्मचर्य हि तुमची वैयक्तिक निवड आहे. जर तुम्हाला लग्न करायचे असेल तर करा, आणि जर लग्न करायचे नसेल तर करू नका. असे खूप लोक आहेत जे लग्न करून दुखी आहेत, आणि अशीही लोक आहेत जी लग्न न करता दुखी आहेत. मला फक्त पाहिजे आहे कि तुम्ही सुज्ञ व्हा . कुठल्याही एका गोष्टीत केंद्रित व्हा ते खूप महत्वाचे आहे.

सृष्टी देवता आहे

प्रश्न : कोणाला मी समर्पण करावे?
श्री श्री रवी शंकर : परमात्मा कि जो माझ्या आत आहे, त्या परमात्म्याला मी समर्पण करतो.

प्रश्न : पूजा काय आहे?
श्री श्री रवी शंकर : जिचा जन्म पुरातन काळापासून झाला आहे (संपूर्णपणे) तीच पूजा आहे. जेव्हा कृतज्ञता अगदी सदगतीत होतात, जेव्हा कंठ दाटून येतो कृतज्ञतेच्या भावनेने तेव्हा तुम्ही जे काही कर्म करता तिलाच पूजा म्हणतात. जेव्हा आपण सगळे समर्पण करतो - त्या भावना तिलाच पूजा म्हणतात.

प्रश्न : गुरुजी हिंदुत्वाची जी प्रतीके आहेत त्याच्यामागे जे गूढ अर्थ आहेत ते परस्पर विरोध दर्शवितात त्याबाबतीत तुम्ही बोलला होतात. कृपया ज्या करोडो देविदेवता आहेत त्यांच्याबद्दल काही सांगाल का?
श्री श्री रवी शंकर: करोड ,कोटी म्हणजे प्रकार. ३३ करोड म्हणजे ३३ प्रकारची दैवी स्पन्दने आहेत. आपल्या शरीरात सुद्धा ३३ प्रकारची स्पंदने आहेत. ३३ प्रकारचे जीन्स आपल्या शरीरात असतात. एक विशिष्ठ प्रकार आपले डोळे बनवतो ,एक प्रकार आपले नाक बनवतो त्याचबरोबर एक विशिष्ट प्रकार आपले कानाचे पडदे , केस, नखे. हे सगळे प्रत्येक विशिष्ठ प्रकारच्या जीन्स ने बनलेले आहे कि जी ३३ प्रकारची आहेत.
त्याचप्रकारे ३३ प्रकारच्या ईश्वरी शक्ती आहेत. एकच प्रकाश, एकच देव, एकच परमात्मा तरी सुद्धा ३३ प्रकार आहेत. देवांच्या ३३ प्रकारच्या दैवी शक्ती आहेत. इथे करोड म्हणजे संख्या दर्शवित नाही . दैवी शक्तीला कुलाही आकार , रूप नाही, पण आपल्या प्राचीन संतानी सांगितले आहे कि तुम्ही कुठच्याही रूपाने, नावाने भजू ,पुजू शकता. सगळी हजारो नवे हि देवाचीच आहेत. हे खूप गहिरे विज्ञान आणि अंतरज्ञान आहे. हे खूप अदभूत आहत जेव्हा तुम्ही त्याच्या खूप खोलात जाता तेव्हा तुम्हाला त्यातले गम्य कळते. लोक ज्यांनी हे लिहिले, ज्याचा शोध लावला त्यांना खरच आश्चर्यकारक ज्ञान आहे. हे विश्व तसे सोपे अजिबात नाही.खूप गुंतागुंतीचे आहे.आधुनिक भौतिकशास्त्र हि हेच सांगते कि जेवढे तुम्ही खोल जाल तेवढे अधिक पहेलू तुम्हाला दिसतील.हे विश्व खूप वेगळे आहे, हि ईश्वरी शक्ती जी नियम सांभाळते आणि जिने इतके वेगळे विश्व बनवले ती देवता . इंग्रजी नाव डेवीड आणि संस्कृत मध्ये देव + विद , देव म्हणजे दैवी शक्ती आणि विद म्हणजे माहित असणे. डेवीड म्हणजे ज्याला दैवी शक्ती म्हणजे काय ते माहित असते.हि दैवी शक्ती म्हणजे कुठे स्वर्गात नसते ती ह्या जगातच आहे , ह्या विश्वातच आहे, सगळीकडे आहे. आणि ते तुम्हाला जाणवले पाहिजे जेव्हा तुमचे मन शांत असेल, नितळ, प्रसन्न आणि हृदयात स्थिरावले आहे, जेव्हा मन आणि बुद्धी चा एकत्र मिलाप होऊन ते एकजीव होईल तेव्हा तुम्ही हे समजून घेण्याच्या मनस्थितीत असाल कि हि वास्तविकता सूक्ष्म आहे आणि सृष्टी देवता आहे.

प्रश्न : गुरुजी ही जी दैवी शक्ती आहे ती आपल्या थोड्या प्रार्थनेलाच उत्तर देते तर काही प्रार्थना अनुत्तरीतच राहतात असे का?
श्री श्री रवी शंकर : मला खरचं माहित नाही कि काही प्रार्थनांचीच उत्तरे मिळतात आणि काहींची मिळत नाहीत. मला काही कल्पना नाही .पण तेच कदाचित तुमच्यासाठी चांगले असेल. आणि आत्ता जे तुम्हाला हवे आहे त्याबाबतीत तुमचे विचार आणि मन बदलू शकते. जेव्हा तुम्ही खरेदीला जाता - भारतात तरी हे नेहमी घडते , खरेदी करताना दुकानदाराला तुम्ही विचारता कि मी नंतर येऊन हि वस्तू बदलू शकते का, जर मला नाही आवडली तर? मग ते घरी जातात आणि नाही आवडली तर दुसऱ्या दिवशी बदलून घेतात. सर्वात अविश्वासू हे आपले मनच असते कारण तुम्हाला माहित नाही कि आत्ता काय हवे आहे आणि नंतर काय पाहिजे आहे? म्हणून मनाला त्याच्या मूळ उगमस्थानाकडे आणणे महत्त्वाचे आहे. मनाचे केंद्रस्थान हे खूप महत्त्वाचे असते अध्यात्मिक उत्क्रांतीसाठी . हे समजून घ्या कि काय अशाश्वत आहे आणि काय अविनाशी आहे. कुठली गोष्ट तुमच्या आयुष्यात चिरकाल आनंद आणणार आहे आणि कुठली गोष्ट तात्पुरती अनुकूल वाटून अनंत काळासाठी दुख आणणार आहे. कुठल्या गोष्टीचा परिणाम तात्पुरता अस्वस्थ करणारा आहे परंतु अनंत काळासाठी आनंद आणणारा आहे. आणि त्याचबरोबर कुठल्या गोष्टीच्या कारणामुळे चिरकाल अस्वस्थता राहणार आहे. ह्यालाच विवेक , तार्तम्यता म्हणतात . चातुर्य - आहे हे जाणून घेणे.

आनंद हा तुमच्या मनावर अवलंबून असतो

बंगलोर आश्रम , जान १७:

प्रश्न : जेंव्हा सगळे झोपलेले असतात तेंव्हा गुरुजी जागे असतात. तुम्हाला त्याचा काही त्रास होत नाही का?
श्री श्री रवी शंकर:
तुम्ही झोपलेले असताना तुमच्या घरासमोर एक चौकीदार असतो. ज्यांचापुढे मोठे प्रश्न असतात त्यांना लहान लहान प्रश्न काही वाटत नाही. सामान्य लोकांना ज्या गोष्टींची चिंता वाटते त्याची योगी पुरुषांना वाट्त नाही. योगी पुरुषासाठी सर्व काही शक्य आहे.

प्रश्न : भक्ती मिळवण्यासाठी मी कुठे जावे?
श्री श्री रवी शंकर
: भक्ती – प्रीती – भक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. केवळ स्मरण करून त्तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही जिथे असाल तिथून भक्ती करू शकता. कोणी तुम्हाला थांबवू शकते का? चालताना, खाताना तुम्ही समर्पित राहू शकता.

प्रश्न : आर्ट ऑफ लिव्हिंग ने मला बरेच काही दिले आहे, मला काहीतरी द्यायचे आहे, सेवा करायची आहे. मी की करू शकतो?
श्री श्री रवी शंकर
: आश्रमात येऊन कधीही तुम्ही सेवा करू शकता.

(The person then tells Sri Sri Ravi Shankar: I’m very happy to have food with many people, with no differences between people and so much togetherness.)

प्रश्न : गुरुजी , मला माझ्या भूतकाळाचा त्रास होतो, मी काय करू?
श्री श्री रवी शंकर
: झाले ते जाऊ देत. क्षमेला पण विसरून जा. क्षमा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागते.त्याला एका स्वप्नासारखे बघा. कोणी स्वप्नाचा विचार करत बसते का? त्याच प्रमाणे आपला भूतकाळ पण सोडून द्या. एक भविष्य सांगणारा भक्त एक दिवस म्हणाला, "माझा पाय मोडला. मी रात्री झोपलो होतो. आणि मला मी एका वाघाशी लढत आहे असे स्वप्न पडले. मी भिंतीवर लाथ मारली आणि पाय मोडला. वाघ माझ्या स्वप्नात होता, मी स्वप्नात लाथ मारायला हवी होती" अडचणीमुळे थांबू नका, चालत राहा.

प्रश्न : मी जिथे जातो तिथे मला दुक्ख दिसते. मी कुठे जाऊ आणि की करू?
श्री श्री रवी शंकर
: अंतर्मुखी (आत जाणे). बाहेर बाजार आहे. गावातल्या बाजारात, पुलाखाली, लोक झोपलेले असतात. तुम्ही त्यांचाकडून शिका. ते भर बाजारात झोपू शकतात. तुम्ही पण ध्यान करा आणि शांत व्हा. किंवा इथे या. तुम्हाला शांतता मिळेल. २० अडचणी असतील पण १०० चांगल्या गोष्टी पण असतील. तरी सुद्धा मान त्या २० अडचणीतच अडकलेले असते.

प्रश्न : ध्यानाच्या सी डी मध्ये दिलेल्या सूचना मी पळू शकलो नाही .
श्री श्री रवी शंकर
: ध्यानात मला ऐकायचा प्रयत्न करू नका, जे होतंय ते होऊ द्यात.सल्ला जसे ऐकता त्याप्रमाणे करा. एका कानाने ऐका आणि दुसर्या कानाने सोडून द्या! तुम्ही नुसते बसलात तरी ओउरेसे आहे.

प्रश्न: समाजात सगळेजण शांतपणे राहत आहेत. तरी काही लोक अशांती निर्माण करतात. आपण की केले पाहिजे?
श्री श्री रवी शंकर
: काही गोष्टी करा आणि काही काही गोष्टी करू नका. अस्पृशाते (जातीयता) कुणालाही काहीही मदत करत नाही. कुणाचाही दुस्वास करू नका. मेलेल्या सापाला उगीच मारत बसतो, तेव्हा तुमचाच हाताला लागते. तरी सुधा काही ठिकाणी हातात काठी असणे जरुरी असते. कशाचाही द्वेष करू नका.

प्रश्न: तुम्ही जे टाळत आहात ते तुमच्या आयुष्यात घडेल हे तत्व मी पाळतो. तरीसुद्धा मी काही गोष्टी टाळतोच असे मला दिसते.
श्री श्री रवी शंकर:
मन आणि शरीराचे नियम वेग वेगळे आहेत. जे टाळत आहात ते मनात घडते, शरीराचे तसे नाही.

प्रश्न: आयुष्याची व्याख्या काय? आनंदी आयुष्य कसे जगावे?
श्री श्री रवी शंकर:
आर्ट ऑफ लिव्हिंग त्याच्याच बद्दल आहे. आयुष्य व्याख्येच्या पलीकडे आहे. व्याख्या करणे किंवा पकडणे याच्या पलीकडे आयुष्य आहे. ते इतके मोठे आहे, व्यापक आहे की काही शब्दात त्याला बांधता येणे शक्य नाही. त्याची व्याख्या करायला जाताना तुम्ही त्याला खूपच छोटे करून टाकता. आनंद हि अशी गोष्ट आहे की ज्याचा आपण नेहमी मागोवा घेत राहिले पाहिजे. नकळत आपण सगळे आनंदी आहोत, पण कुठेतरी आनंदाचा मागोवा घेत असताना आपण अडकून बसतो आणि लक्ष्य चुकवतो. अध्यात्म म्हणजे की आहे - चेहेऱ्यावर एक हसू आणणे.

एकदा तुम्हाला प्रकाश दिसला, की सारा भूतकाळ एका स्वप्नासारखा वाटू लागतो, पुढे चला. जागे व्हा आणि वर्तमानात काय चालले आहे ते पहा, तुम्ही तिथे आनंदी असाल, कुठलीही अट न ठेवता. तेव्हा तुम्ही आनंदी असाल आणि तुमचा आनंद इतक कुणावरही अवलंबून नसेल. आनंद हा तुमच्या मनावर अवलंबून आहे. जेंव्हा मन भूतकाळातील कुठल्याही प्रभावापासून आणि भविष्यातल्या चिंतांपासून मुक्त असते, तेंव्हा तिथे आनंद असतो.

प्रश्न: देवाने त्याच्या अगाध हुशारीतून हे जग बनवले आहे, मी मांस का खाऊ नये हे मला कळत नाही? मी जन्मतःच मांसाहारी आहे आणि मी ते सोडू शकत नाही.
श्री श्री रवी शंकर:
ओके. मांस आवडीने का खावेसे वाटते? (त्या महिलेने उत्तर दिले चव आणि सुवास) सुवास आणि चव ज्याचापासून येते ते म्हणजे मसाले. ठीक आहे. चव आणि वासाबद्दल, अध्यात्मिकते बद्दल विसरून जा. तुम्हाला माहिती आहे, मांसाहारी पदार्थांबद्दल नवीन काय कळले आहे? १ किलो मांस हे ४०० लोकांच्या जेवणाइतके आहे. फक्त १०% लोक जरी शाकाहारी झाले. ग्लोबल वॉर्मिंग चा प्रश्न कमी होईल.

आत्ता आपल्याला आपला ग्रह वाचवायचा आहे. मांसाहारी पदार्थ आपल्याला कमीच केले पाहिजेत. आपल्या ग्रहासाठी, जेणेकरून सगळ्यांना अन्न मिळेल, आपल्याला त्याची काळजी असली पाहिजे. देवाने आपल्याला दुसऱ्याची आणि ग्रहांची काळजी घ्यायची बुद्धी दिली आहे! तुम्ही भरपूर खाल्ले आहे, त थोडे कमी ख म्हणजे ज्यांना खायला काहीच नाही त्यांना थोडेतरी मिळेल. जास्तीत जास्त लोकांना खायला मिळेल .

जेव्हडे आपण निर्माण करतो त्याचा ४०-५०% जास्त आपण खात आहोत. झाडे लावा, शाकाहारी बना, हे अध्यात्मिक होण्याचा एक भाग आहे. ध्यान म्हणजेच फक्त अध्यात्मिकता नव्हे. भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा १००० लोकांमागे ४०० गायी होत्या. आता आपल्याकडे १००० लोकांमागे १०० गायी आहेत. २० वर्षांमध्ये १००० लोकांमागे फक्त २० गायी असतील. मुलांना दुध, दही, तूप यासारखा त्यांचा मुख्य आहार मिळणार नाही. आपल्याला प्राण्यांचे, आपल्या ग्रहाचे रक्षण केले पाहिजे.

प्रश्न: गुरुजी, माणूस कायम भांडतो. जगात कधी शांतात असेल का? जग कधी हिंसाचार रहित होईल का?
श्री श्री रवी शंकर:
हं. तेच आपले स्वप्न असले पाहिजे आणि त्यासाठीच आपण काम केले पाहिजे. संपूर्ण जड एक कुटुंब आहे. वसुधैव कुटुंबकम हे पुराणात सुद्धा सांगितले आहे


आयुष्याची व्याख्या


प्रश्न: आयुष्याची व्याख्या काय? आनंदी आयुष्य कसे जगावे? 
श्री  श्री  रवी  शंकरआर्ट ऑफ लिव्हिंग त्याच्याच बद्दल आहे. आयुष्य व्याख्येच्या पलीकडे आहे. व्याख्या करणे किंवा पकडणे याच्या पलीकडे आयुष्य आहे. ते इतके मोठे आहे, व्यापक आहे की काही शब्दात त्याला बांधता येणे शक्य नाही. त्याची व्याख्या करायला जाताना तुम्ही त्याला खूपच छोटे करून टाकता. आनंद हि अशी गोष्ट आहे की ज्याचा आपण नेहमी मागोवा घेत राहिले पाहिजे. नकळत आपण सगळे आनंदी आहोत, पण कुठेतरी आनंदाचा मागोवा घेत असताना आपण अडकून बसतो आणि लक्ष्य चुकवतो. अध्यात्म म्हणजे की आहे - चेहेऱ्यावर एक हसू आणणे. 
एकदा तुम्हाला प्रकाश दिसला, की सारा भूतकाळ एका स्वप्नासारखा वाटू लागतो, पुढे चला. जागे व्हा आणि वर्तमानात काय  चालले आहे ते पहा, तुम्ही तिथे आनंदी असाल, कुठलीही अट न ठेवता. तेव्हा तुम्ही आनंदी असाल आणि तुमचा आनंद इतक कुणावरही अवलंबून नसेल. आनंद हा तुमच्या मनावर अवलंबून आहे. जेंव्हा मन भूतकाळातील कुठल्याही प्रभावापासून आणि भविष्यातल्या चिंतांपासून मुक्त असते, तेंव्हा तिथे आनंद असतो. 

प्रत्येकाला योगदान देण्याची संधी दिली गेली पाहिजे


बंगलोर आश्रम, फेब. ०९ 

श्री श्री रवी शंकर आश्रमात संध्याकाळी ८:३० वाजता विशालाक्षी मंडपमध्येच सत्संग साठी  आले. वेलान्गांनी या तमिळ नाडूतील एका छोट्या गावाला भेट देऊन आले होते. इंडिअन प्रिस्त कोन्ग्रेस च्या १००० रोमन कॅथोलिक धर्मगुरूंशी संवाद साधतानाच्या अनुभवाबद्दल बोलत होते.(विस्डम ब्लोग वर पत्ता दिलेला आहे) तेंव्हा एक छोटी मुलगी उठली आणि श्री श्री ना म्हणाली की तिच्या गावात आर्ट ऑफ लिविंग चे केंद्र नाही, त्याचमुळे आर्ट ऑफ लिविंगचे कार्यक्रम होत नाहीत. हे सांगितल्यावर टी रडायला लागली. त्यांनी तिला आश्वासन दिले की लौकरच तिथे केंद्र सुरु होईल. त्या मुलीची आई उभी राहिली आणि म्हणाली " आमच्याकडे जे आहे त्यातून एक जागा खरेदी करायची आहे जेणेकरून तेथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे केंद्र उभे करता येईल.
ते म्हणाले " तुम्ही भावनिक होऊन जे आहे ते देऊ शकत नाही, कारण मी ते तसे घेणार नाहीit . या केंद्रासाठी खूप लोकांचे थोडे थोडे योगदान पाहिजे. पूर्वीच्या बऱ्याच लोकांनी हे सांगितले आहे. सुरुवातीला मी जेंव्हा केनडा ला गेलो तेंव्हा तिथे केंद्र नव्हते, एक माणूस माझ्याकडे एका आणि म्हणाला " श्री श्री, माझे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. माझ्याकडे १५००० डॉलर आहेत आणि मला हे सगळे वापरून आर्ट ऑफ लिव्हिंग चे केंद्र उभे करायचे आहे." मी त्याला नकार दिला आणि म्हणालो, " मला आर्ट ऑफ लिव्हिंग चा आश्रम उभारायची काहीही घाई नाही. जर तुझा आग्रहाच असेल तर १००० डॉलर दे आणि जर अजूनही काही द्यायचे असेल तर, २००० डॉलर दे पण त्यापेक्षा जास्त नाही. प्रत्येकाला योगदान द्यायची संधी दिली पाहिजे.
७ मार्च २०११ : श्री श्रीं  बरोबर प्रश्नोत्तरे
श्री श्री रवी शंकर : श्रीमंती म्हणजे फक्त पैसा असणे नव्हे. तुमचाकडे बँकेत भरपूर पैसे असतील, भरपूर दौलत असेल पण जर ताण असेल पण जर त्याचा तुम्हाला ताण येत असेल, त्रास होत असेल तर कोणीही तुम्हाला श्रीमंत म्हणू शकणार नाही. श्रीमंती म्हणजे  भरपूर पैसे नव्हे, तर  आयुष्यातील उदारता ओळखणे, त्याला महत्व देणे, आयुष्याचा सन्मान करणे. माणसामधला विश्वास त्याची श्रीमंती दाखवतो. श्रीमंती तुम्हाला कासाहासाठी हवी आहे? आत्मविश्वास वाढवणे..बरोबर? पण जर त्यामुळे कमजोरी वाढत असेल तर त्या श्रीमंती चा काहीही उपयोग नाही, जर श्रीमंतीमुळे आजारपण वाढले असेल तर ती श्रीमंती नाही, श्रीमंती जर भांडणाचे कारण बनत असेल तर ती श्रीमंती नाही, बरोबर! ज्ञान म्हणजेच श्रीमंती, विद्या म्हणजे श्रीमंती, आरोग्य म्हणजे श्रीमंती, आत्मविश्वास म्हणजे श्रीमंती, मुल्ये म्हणजे श्रीमंती. जर तुमच्यामध्ये विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता, कुठलीही परिस्थिती सांभाळू शकता, ती श्रीमंती आहे. 

प्रश्न: गुरुजी  मला एक जाणवले की लोकांना प्रेम देता येते पण ते घ्यायचे कसे ते कळत नाही. मग आत जे इतके प्रेम आहे त्याचे की करायचे? गुरुजी मागणी आणि पुरवठा यांचा ताळ - मेळच राहत नाही. 
श्री श्री रवी  शंकर: हो, मी आधीच या बद्दल बोललो आहे; खूप लोकांना माहिती नाही की प्रेम घ्यावे कसे. कोणीतरी येते आणि म्हणते की मी तुझावर प्रेम करतो, आणि इतके प्रेम करतो.. थोड्या वेळाने तुम्हाला वाटते की कान बंद करून घ्यावे आणि म्हणवे की हे माझासाठी खूप जास्त होते आहे, मला पळून जाऊन द्या, कारण काही जण प्रेमात आरामदायक नसतात आणि आपण कधीच आपल्या स्वतःच्या आत डोकावून पाहत नाही. आपण की आहोत हे आपण ओळखलेच नाहीये. आपण प्रेम नावाच्या पदार्थापासून बनलो आहोत हे आपल्याला माहीतच नाहीये. जेंव्हा आपण स्वताशी जोडलेले नसतो तेंव्हा दुसऱ्याशी मोकळेपणाने जोडले जाऊ शकत नाही. म्हणून जेंव्हा कोणी तुमच्या जवळ यायचा प्रयत्न करतो तेंव्हा तुम्हाला कसेसे होते, कारण तुम्ही स्वतःशी जोडलेले नसता. त्यामुळे तुम्हाला कळत नाही की प्रेम घ्यावे कसे, म्हणूनच एक म्हण आहे,"डुकराला मोती चारू नका". आधी प्रेमाला योग्य तो आदर द्या आणि जे त्याचा आदर करत नाहीत त्यांना ते देऊ नका. याचा अर्थ प्रेम देण्यात पण कौशल्य हवे. 
प्रेम देण्याचे कौशल्य म्हणजे प्रेमात असणे, प्रेम हि कृती नाही तर प्रेम हि स्थिती आहे. तुम्ही कुठल्याही अतीशिवाय तिथे राहा, आणि म्हणा की मी कुठल्याही अतीशिवाय इथे आहे तुझ्यासाठी, आता ते तुजवर आहे की येऊन घे. तुमाचामध्ये असलेल्या ताकदी मुळे लोक तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतील. आणि कुठलीही जबरदस्ती न करता समजाऊ शकता की तुमचे किती प्रेम आहे. ते पचवायला वेळ द्या कारण जबरदस्ती केली तर तुमाचासाठी उलटे पण होऊ शकते.

ज्या क्षणी तुमचा केंद्रस्थानी याल, तुम्हाला सगळीकडेच देवत्व दिसेल


कोलकाता  (भारत), फेब. १२
शिव रात्रीला रुद्र पूजेचा आधी श्री श्री रवी शंकर शिव आणि शिवरात्रीचा खऱ्या अर्थाबद्दल बोलले. 
आपण शिव तत्वाबद्दल थोडेसमजून घेऊयात. अगदी थोडेसेच कळू शकते.  बुद्धी संतुष्ट आणि आतील चेतना जागृत असली पाहिजे. संपूर्ण  समाधानासाठी वैज्ञानिकता आणि  अध्यात्मिक ज्ञान या दोन्हीची गरज असते. देवत्व शोधण्यासाठी खूप लांब..तीर्थयात्रेला जायची गरज नसते. तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही देव पाहू शकला नाहीत तर तुम्हाला इतर कुठेही देव दिसणार नाही. जिथे मन लय पावेते तेथे शिव आहे. जिथे आहात तिथे संपूर्ण राहा. ज्या क्षणी तुम्ही तिथे असता, स्व केंद्रित असता, तिथेच तुम्हाला सगळीकडे देवत्व दिसते. हे ध्यान आहे. भगवान शिव च्या अनेक नावापैकी एक नाव आहे विरुपाक्ष - म्हणजे ज्याला आकार तर नाही पण तो पाहू शकतो. सगळीकडे हवा आहे हे आपल्याला माहित आहे आणि आपण ती आपण अनुभवू  शकतो. पण जर हवासुद्धा तुम्हाला अनुभवू शकली तर काय होईल? आपल्या सभोवताली अवकाश आहे, आपल्याला कळते. पण जर अवकाश सुद्धा आपल्याला ओळखायला लागले तर? असे होते. फक्त आपल्याला माहित नाही. वैज्ञानिकांना हे माहित आहे आणि ते त्याला सापेक्षतेचा सिद्धांत असे म्हणतात. जो पाहतो आणि जे पाहतो त्या दोघांवरही परिणाम होतो.  देवत्व तुमचा चहुबाजुना आहे आणि ते तुम्हाला पाहत आहे.  त्याला आकार नाही.  ते आकार विरहित अस्तित्व आणि लक्ष्य आहे.  तोच द्रष्टा, दृष्टी आणि दृश्य आहे. हे आकार विरहित देवत्व म्हणजेच शिवा. फक्त जागरूक होऊन या शिव तत्वाचा अनुभव घेणे म्हणजेच शिव रात्री.


बऱ्याच वेळा उत्सव साजरा करताना जागरुकता नसते. उत्सव साजरा करत असताना गाढ विश्रांती घेणे आणि जागरूक राहणे म्हाजेच शिव रात्री. जेन्वा तुमचा समोर काही अडचण येते तेंव्हा तुम्ही जागरूक असता. जेंव्हा सर्वकाही व्यवस्थित असते, तेंव्हा आपण निवांत असतो; शिव रात्रीला आपण जागरूक राहून विश्रांती घेतो. असे म्हणतात की जेंव्हा बाकी सगळे झोपलेले असतात तेंव्हा योगी जागा असतो. एका योगी पुरुषासाठी प्रत्येक दिवस हा शिव रात्री सारखा असतो. भगवान शिवाबद्दल आदी शंकराचार्यानी एक कविता लिहिली आहे. (श्री श्री त्या कवितेतील काही ओळी म्हणतात)

आद्यंतहीनम - असा की ज्याला शेवट आणि सुरुवात नाही. सर्वदा - तो भोलेनाथ आहे ( सगळ्याचा निरागस राजा) जो सगळीकडे सगळ्या वेळी आहे. आपल्याला असे वाटते की भगवान शिवा म्हणजे तो कुठेतरी दुसरीकडे  गळ्यात साप घालून बसला आहे, शिवा तो आहे की ज्याचात सगळ्यांनी जन्म घेतला आहे, जो सगळ्यांना या क्षणी समेऊन घेतो. जे दिसते ते सगळे त्याचेच रूप आहे.
He permeates the entire creation. तो अजन्म आहे आणि कधी मृत्यू होत नाही.He is eternal.
तो चेतनेचा चौथे रूप आहे, तुर्यावस्था, ध्यानस्थ  अवस्था, की जे जागे होण्याच्या, गाढ झोपेच्या आणि स्वप्नावास्थेच्या पलीकडे आहे.


तो अद्वैत चेतना आहे की जे सगळीकडे आहे. म्हणून शिव पूजा करण्यासाठी तुम्ही स्वतःच शिवा मध्ये विलीन झाले पाहिजे. शिव बनून शिवा ची पूजा केली पाहिजे. चिदानंद रुप - फक्त आनंद रुपी अशी चेतना आहे.
तपो योग गम्य - जो ताप आणि योगाच्या मदतीने जाणून घेता येईल. वेद मधील माहितीचा मदतीने शिव तत्वाचा अनुभव घेता येऊ शकतो. शिवोहम  (मी शिव आहे ), शिवा केवलोहम (फक्त शिवाच आहे )हि स्थिती मिळवता येते. शिवरात्री हा आनद आणि समाधान अनुभव करायचा दिवस आहे.योग शिवाय शिवाचा अनुभव होऊ शकत नाही. योग म्हणजे फक्त आसने नव्हेत तर शिव तत्वाचा अनुभव जो ध्यान, प्राणायाम बरोबर येतो. जेंव्हा ते आतून "वाव" असा आनंद  देते.

शंभो हा शब्द पण तेथूनच उगम पावला आहे - देवत्व किती सुंदर आहे ते जाणून घेणे, निर्मिती आणि स्वत्व! सर्व निर्मितींमध्ये एकाच चेतना असणे हा एक चमत्कारच आहे.  याचा पेक्षा मोठा चमत्कार की असू शकतो. एकच अनेक कसे असू शकतो? हि शिवरात्रीची अनेकातून एका कडे जाण्याची रूढी एकमेव आहे. ध्यान आणि योग हे त्यासाठी जरुरी आहे. ध्यानाशिवाय मन कधीच शांत होऊ शकत नाही. शिवरात्रीला ध्यान, भजन हे सगळे उत्सवाचाच एक भाग आहे. प्रत्येक जन मनापासून सहभागी होतो. प्रत्येकाने गायले पाहिजे. सगळ्या कारणाचे कारण शिव आहे. ज्याच्यामुळे सर्व आहे – झाडे वाढणे, सूर्योदय, वर वाहणे...... प्रत्येक घटनेमागे शिव आहे - ज्याचामुळे सर्व होते आणि ज्याचाशिवाय काहीच होत नाही. पंचमुख, पंचतत्त्व – शिवला पाच मुख आहेत- पाणी, हवा, पृथ्वी, आग आणि अवकाश! या पाच तत्वांना समजून घेणे म्हणजे तत्त्व ज्ञान. आणि मग शिवाची अष्टमुर्तीच्या रुपात पूजा केली जाते(आठ रूपे)– मन, बुद्धी, अहंकार हे समाविष्ट आहेत. हे दोन्ही शिवाचे सरूप आणि अरूप रूपे आहेत. शिवाची प्रार्थना म्हणजे शिव तत्त्वात सामावून जाणे आणि काही चांगल्याची इच्छा करणे. कशाची इच्छा करावी? मोठ्या मनाने संपूर्ण जगासाठी चांगले मागावे, कोणीच दुक्खी नसावे, ‘सर्वे  जनः सुखिनो भवन्तु .’ या मुहूर्तावर एक संकल्प करा.ते असे आहे की जे सारखे सारखे तुमाचाकडे येते,श्वासासारखे, हृदयातील धड धाडी सारखे. आणि असा संकल्प जेंव्हा तुम्ही देवत्वाला समर्पण करता, तो नक्कीच पूर्ण होईल.

आपण सुद्धा निसर्गाची पूजा करतो. देवत्व पृथ्वीवर सगळीकडे आहे. झाडे, पर्वत, नद्या, पृथ्वी आणि मनुष्यप्राणी यांना मान दिल्याशिवाय पूजा कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. सगळ्यांचा सन्मान करणे म्हणजेच दक्षिणा. द म्हणजे देणे आणि दक्षिणा म्हणजे जे आपल्याला स्वच्छ करेल अशा वस्तू देणे. ज्या देण्याने तुमची पापकर्मे नाहीशी होतील. कुठलीही पूजा दक्षिणेशिवाय अपूर्ण आहे. समाजात जेंव्हा आपण कौशल्याने, कुठल्याही प्रकारे मान विचलित होऊ न देता वागतो तेंव्हा सर्व नकारात्मक भावना, जसे की राग, चिंता, दुख्ख नाश होतात. मी असे म्हणेन की तुमचे ताण, चिंता आणि दुक्खे मला दक्षिणा म्हणून द्या. आणि हे कसे होईल? तर साधनेमुळे, सेवा आणि सत्संग.

आतल्या भवन आणि विश्वासाच्या समुद्रात जाण्यासाठी बुद्धीची बोट करा!

आधुनिक जगात ध्यानाची गरज


प्रश्न: आजच्या आधुनिक जगात ध्यान करायची गरज का आहे?
श्री श्री रवी शंकर: आजच्या आधुनिक जगात ध्यानाची गरज.. तुम्हाला माहितीये, जर तुम्ही ध्यानामुळे मिळणाऱ्या फायद्यांकडे बघितले तर लक्षात येईल कि त्याचीच आज गरज आहे. पूर्वीच्या काळी साक्षात्कार व्हावा म्हणून ध्यान केले जायचे, 'स्व' चा शोध घेण्यासाठी. मानसिक कष्टामधून मुक्ती मिळवण्यासाठी, त्यातून बाहेर येण्यासाठी, अडचणीमधून बाहेर येण्यासाठी सुद्धा ध्यान मदत करते. स्वतःच्या क्षमता वाढवण्याचा मार्ग म्हणजे ध्यान; तीन गोष्टी! 

आज साक्षात्काराला आपण बाजूला ठेवूयात, आजच्या विचित्र सामाजिक परिस्थितीमुळे, ताण-तणावामुळे ध्यानाची गरज निर्माण झाली आहे. जितकी जास्त जबाबदारी तितकी जास्त ध्यानाची गरज आहे. जर तुमच्याकडे करण्यासारखे काहीच नसेल, तर कदाचित तुम्हाला ध्यानाची गरज भासणार नाही कारण तुम्ही काहीच करत नाही. कामात जितके जास्त व्यग्र असाल तितका कमी वेळ तुमच्याकडे असतो, जितके जास्त काम कराल, तितक्या जास्त इच्छा मनात असतात आणि ध्येय पण असतात, तेवढेच ध्यान पण करायची गरज वाढते कारण ध्यान फक्त ताणातून मुक्तता देत नाही तर नवीन गोष्टीना तोंड देण्याची ताकद पण वाढवते. ध्यानामुळे आरोग्य वाढते, ध्यान हे आत्म्यासाठी अन्न आहे, मनासाठी शक्ती देणारे आहे तर शरीरासाठी आयुष्यरेखा आहे. ध्यान तुमचे शरीर आकारात ठेवते, चेता संस्थेला मदत करते, मनाला मदत करते, जागरुकता वाढवते, दृष्टीकोन सुधारते आणि स्वतःला इतरांसमोर नीट मांडायला पण मदत करते, सगळे मिळाल्यावर अजून काय पाहिजे? .
ध्यानाचे फायदे बरेच आहेत, थोडक्यात म्हणायचे तर .. जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर ध्यान करा. आनंदी आणि आरोग्यपूर्ण राहण्यासाठी ध्यानाला पर्याय नाही. 

प्रश्न: ध्यान करण्याच्या कलेचे मनाला फायदे  कुठले, शरीराला, नात्यांना, अध्यात्मिक इच्छा आणि समाजाला फायदे कुठले?
श्री  श्री  रवी  शंकर : ध्यान तुमचा दृष्टीकोन बदलायला मदत करते. मन स्पष्ट विचार करू शकते. लोकांशी कसे बोलावे, कसे वागावे, विविध घटनांमध्ये कसा प्रतिसाद द्यावा,  इ. मध्ये ध्यानामुळे सकारात्मक बदल होतो. या सर्वांमुळे  हिंसा विरहित समाज, रोग विरहित शरीर, गोंधळ विरहित मन, मुक्त बुद्धी, आघात विरहित बुद्धी आणि दुक्ख विरहित आत्मा यांसाठी मदत होते.
श्री श्री रवी शंकर नुकतेच उत्तर भारतच्या एक आठवड्याच्या दौर्यावरून परत आले. तिथलाच एक अनुभव सांगताना श्री श्री म्हणाले,  आसाम मधील बोडोलेंड म्हणून एक जागा आहे, एक अतिशय दुर्गम प्रदेश, हिंसाचाराने भरलेला! आपल्या वाय. एल. टी. पी. प्रशिक्षकांनी इतके चांगले काम केले आहे. बोडोलेंड मध्ये जवळ पास १ ,५० ,०००  लोक भर दुपारी सत्संग साठी गोळा झाले होते. इतक्या दुर्गम भागामध्ये लोकांनी चांगले काम कारला सुरुवात केली आहे. तिथे  तुम्ही वीज नाही म्हणून तक्रार करू शकत नाही, कारण तिथे तसेही वीज नाही.  तिथे वीज नाही, पाणी नाही आणि रस्ता पण नाही. पण तिथले लोक समाधानी आहेत. आपल्याला सर्व सोयी सुविधा उपलब्ध असताना आपण तक्रार करतो, पण जिथे सोयी नाहीत तिथे सुधा लोक समाधानाने राहतात.
(श्रोत्यांपैकी कोणीतरी प्रश्न विचारते)
प्रश्न : दारू आणि सिगारेटबद्दलची इच्छा कशी सोडावी?
श्री श्री रवी शंकर : सिगारेट आणि दारू सोडण्यासाठी तुम्ही तीन गोष्टी करू शकता.

  1.  अध्यात्मिक साधना रोज करा. यातून तुमची अशा इच्छा मधून सुटका होईल. 
  2. असा विचार करा कि दारू आणि सिगारेट मुळे तुमचे नशीब खराब होणार आहे. तुम्ही जर ते घेतलेत तर काही तरी वाईट गोष्ट तुमचा आयुष्यात होईल.
  3. जर तुम्ही १ महिन्यासाठी सिगारेट आणि दारू सोडणार असाल तर कोणीतरी १ करोड देणार आहे, तर तुम्ही की कराल? जेंव्हा  जेंव्हा इच्छा होईल तेंवा तेंवा असा विचार करा कि तुमी १ करोड रुपये घालवत आहात.
तुम्ही लोभ किंवा भीतीमुळे स्वतःवर काबू ठेवाल. वाईट सवयी सोडण्यासाठी लोभ आणि भीती एखाद्या दिव्या औषधी सारखे उपयोगी पडतात, जादू झाल्यासारखे.
यानंतर श्री श्री रवी शंकर यांनी श्रोत्यांचे ध्यान घेतले.
"जे अव्यक्त आहे ते प्रेम
जे अटल आहे ते सौंदर्य 

जे टाळता येत नाही ते सत्य "
~ श्री  श्री  रविशंकर